विजय कदम (लोकहित लाईव्ह न्युज संपादक)
नांदेड वाघाळा महानगर पालिकेच्या निवडणुकीत भारतीय जनता पार्टीला स्पष्ट बहुमत मिळाले. प्रथमच मनपावर भाजपा झेंडा फडकणार आहे. भाजपा पाठोपाठ एमआयएमने १३ जागा पटकावल्या, यापुर्वी एम आयएमचा एकही नगरसेवक नव्हता. मनपाच्या सत्तेत असलेल्या काँग्रेसला १२ जागा मिळाल्या. त्यांच्या जागा घटल्या असल्या तरी नेतृत्वहीन, नेते, पदाधिकारी कार्यकत्यांची बाणवा असताना यश मिळविले. शिंदे सेनेला महापौरपदाचे स्वप्न पडले होते. पण केवळ ४ जागेवर समाधान मानावे लागले.
उपमुख्यमंत्री अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे आ. प्रताप पाटील चिखलीकर यांनी आमचाच महापौर असा दावा केला होता. पण मतदारांनी राष्ट्रवादी काँग्रेसला अक्षरशः झिडकारले, केवळ एक जागा मिळाली. वंचित मात्र अपेक्षित यश मिळविले. तब्बल पाच जागा मिळवत मनपात प्रवेश केला. एकमेव अपक्ष उमेदवार मीनव पाटील यांनी विजयश्री मिळविली. त्यांनी शिवसेनेच्या विरोधात बंड करत उमेदवारी कायम ठेवली. त्यांच्या उमेदवारीला आ. बालाजी कल्याणकर यांनी विरोध केला. तरीही त्यांनी बंडखोरी करत विजय मिळविला नांदेड वाघाळा महानगर पालिकेच्या निवडणुकीची मतमोजणी शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालय पार पडली. सकाळी १० वाजता मतमोजणीला सुरुवात झाली. प्रथम पोस्टल मतांची मोजणी करण्यात आली. त्यानंतर सकाळी ११.३० च्या सुमारास ईव्हीएम मशिनची मतमोजणीला प्रारंभ झाला. प्रथम गाडीपुरा, वजिराबाद प्रभागाचा नंबर लागला. भाजपाचे चारही उमेदवार विजयी झाले. त्यानंतर भाजपाने विजयी घोडदौड सुरूच ठेवली. काँग्रेस व एमआयएमने खाते खोलते. वंचितने एकाच प्रभागातून चार जागेवर विजय मिळवत खाते खोलले. उपमुख्यमंत्री अजित पवार राष्ट्रबादी काँग्रेसला मतदारांनी स्विकारलेच नाही. केवळ एका जागेवर विजय मिळाला. शिंदे सेनेचे आ. बालाजी कल्याणकर व आ. आनंद बोंढारकर यांनी प्रतिष्ठा पणाला लावत महापौर पदावर दावा केला पण मतदारांनी एकेरी आकड्यात बसविले.मतमोजणी संथ गतीने होत होती. त्याचा परिणाम निकालावर झाला. त्यामुळे मतदानाचा निकाल उशिरा लागत होता. रात्री ७.३० वाजेपर्यंत निकाल लागला नव्हता. फेरमतमोजणीमुळे निकाल लांबला.मतदारांना नकारात्मकता आवडत नाही – खा. अशोक चव्हाण मतदारांना नकारात्मकता आवडत नाही, हे पुन्हा एकदा स्पष्ट झाले, खा. अशोक चव्हाण यांनी आ. प्रताप पाटील चिखलीकर व आ. हेमंत पाटील यांचे नाव घेता टोला लगावला.
नांदेड वाघाळा महानगर पालिकेच्या निवडणुकीत भाजपाला स्पष्ट बहुमत मिळाल्यानंतर खा. अशोक चव्हाण यांनी मतदारांनी भाजपाला स्पष्ट बहुमत मिळवून दिल्याबद्दल मतदारांचे आभार मानले. निवडणुकीचे यश हे नांदेडकरांच्या विश्वासाचे आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वावर मतदारांनी विश्वास व्यक्त केला. भाजपातील सर्व नेते, पदाधिकारी, कार्यकर्त्यांच्या मेहनतीचे फळ आहे. नांदेडकरांनी विकासाला, सकारात्मकतेला कौल दिला आहे. विरोधकांकडे मुद्देच नव्हते. त्यांनी शिवश्याप दिला, अपप्रचार केला. पण मतदारांना आवडले नाही. विरोधक भुईसपाट झाले आहेत, असा टोला खा. अशोक चव्हाण यांनी लगावला.काँग्रेसला शह देण्यासाठी व दलित, मुस्लिम बहुल भागात भाजपाला यश मिळणार नाही, हे गृहीत धरून मराठवाडा जनहित पार्टी व शहर विकास आघाडीच्या वतीने दोन प्रभागात प्रत्येकी चार उमेदवार उभे केले होते. मराठवाडा जनहित पार्टी व शहर विकास आघाडीला खा. अशोक चव्हाण यांचा पाठिंबा असल्याची चर्चा होती. निवडणुकीत मात्र मराठवाडा जनहित पार्टी व शहर विकास आघाडीचा धुव्वा उडाला.माजी पदाधिकाऱ्यांची पुन्हा एन्ट्री नांदेड वाघाळा शहर महानगरपालिकेच्या निवडणुकीत माजी महापौर बलवंतसिंघ गाडीवाले, शैलेजा स्वामी, शिला भवरे, जयश्री पावडे, तसेच माजी सभापती किशोर स्वामी, विरेंद्रसिंध गाडीबाले, श्रीमती मंगला देशमुख हे पुन्हा विजयी झाले आहेत. महापालिकेचे माजी विरोधी पक्षनेते दीपकसिंह रावत, माजी उपमहापौर सतीष देशमुख तरोडेकर, अब्दुल गफार, मसुदखान यांनी विजय मिळविला आहे. माजी नगरसेवक राजू येन्त्रम, वैशाली देशमुख, ज्योस्त्ना गोडबोले, सुदर्शना खोमणे, गुरमितसिंध नवाब, अभिषेक सौदे, प्रशांत तिडके, सविता बिरकुले, दयानंद बाघमारे हे पुन्हा नगरसेवक म्हणून विजयी झाले आहेत. मनपा निवडणुकीत सहाव्यांदा निवडून येण्याचा विक्रम विरेंद्रसिध गाडीवाले यांनी केला आहे.प्रभाग क्रमांक ६ गणेनगर मधून भाजपाचे उमेदवार शिला भवरे, वैशाली देशमुख, आशिष नेरलकर विजयी झाले होते. मात्र राजेश यन्नम पराजीत झाले म्हणून मतदान केंद्राबाहेर बाहेर गेले होते. यावेळी त्यांचे डोळे पाणावले होते. यन्नम पराजीत झाल्याची माहिती मिलिंद देशमुख यांना समजली. पण यन्त्रम विजयी झाल्याचा आत्मविश्वास होता. मिलिंद देशमुख मतदान केंद्रावर आले. पण पोलिसांनी त्यांना मतमोजणी केंद्रात सोडण्यास नकार दिला. त्यामुळे मिलिंद देशमुख व पोलिसांमध्ये बाचाबाची होऊन खडाजंगी झाली. अखेर वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी मध्यस्थी केली. मिलिंद देशमुख यांना मतमोजणी केंद्रात सोडले. मतमोजणी केंद्रात पडताळणी केली असता यन्नन विजयी झाल्याचे स्पष्ट झाले.त्यानंतर निवडणूक अधिकाऱ्यांनी यन्त्रम यांना विजयी घोषित केले.












