हुतात्मा मधुकर चौधरी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, उमरखेड येथे राष्ट्रमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे प्रभारी गटनदेशक श्री ए. डी. कुंभारे सर होते. कार्यक्रमाला प्रमुख वक्ते श्री उद्धवजी गायकवाड सर, प्रमुख मार्गदर्शक श्री उत्तम बरवट सर तसेच आयएमसी सदस्य श्री सुनील चेके सर उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला मा. अध्यक्ष व प्रमुख वक्ते यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. यानंतर मान्यवरांनी राष्ट्रमाता जिजाऊ यांच्या आदर्श मातृत्वाचा तसेच स्वामी विवेकानंद यांच्या प्रेरणादायी विचारांचा युवकांवर होणाऱ्या सकारात्मक प्रभावावर सखोल मार्गदर्शन केले.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन इलेक्ट्रिशियन ट्रेडच्या विद्यार्थिनी दीपिका यांचेत व ऋतुजा कदम यांनी केले, तर आभार प्रदर्शन कुमारी ममता कांबळे हिने केले.
हा कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी संस्थेतील शिल्पनिदेशक श्री किरण पाटील सर, शिवानंद निंबोळकर सर, निखिल परोपटे सर, आशिष नारनवरे सर, के. एस. शिंदे सर, मनीषा नरवाडे मॅम, अश्विनी निंबेकर मॅम,
बी. एस. नरवाडे सर, मयूर कुंभारे सर, श्री एस. बी. इंगोले सर, उमेश सोनवणे सर, आदित्य भोसले सर, पंकज शिरसाट सर, विजय थोमाळे सर, गोदाजी पपुलवाड व दिलीप धुळे यांनी विशेष परिश्रम घेतले.
कार्यक्रमास शिक्षकवृंद, कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.













