विजय कदम (लोकहित लाईव्ह न्युज संपादक )
नांदेड जिल्ह्यातील किनवट येथील एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयाच्या प्रांगणात दिनांक 23 जानेवारी 2026 रोजी सोनबा केदोजी वानोळे हे आमरण उपोषणाला बसणार आहेत. जिल्हा वार्षिक आदिवासी उपाययोजना 2023 2024 या कालावधीमध्ये प्राप्त निधी व लाभार्थ्याची यादी मिळणेबाबत माहिती अधिकारांन्वये कार्यालयाकडून माहिती देण्यास टाळाटाळ करीत असल्यामुळे एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय किनवट कार्यालयांना वारंवार पत्रव्यवहार करून सुद्धा माहिती मिळत नसल्यामुळे शुक्रवार दिनांक 23 जानेवारी 2026 रोजी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयाच्या प्रांगणात आमरण उपोषणाला बसणार आहेत. याकरिता प्रकल्प अधिकारी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय किनवट यांना लेखी निवेदनाद्वारे कळविण्यात आले आहे. प्रति लिपी म्हणून जिल्हाअधिकारी साहेब कार्यालय नांदेड, जिल्हा पोलीस अधीक्षक नांदेड, उपविभागीय पोलीस अधिकारी किनवट, पोलीस निरीक्षक किनवट,यांना लेखी निवेदनाद्वारे कळविण्यात आले आहे.











