विजय कदम (लोकहित न्यूज संपादक)
ग्रामीण महाराष्ट्रात भारतीय जनता पार्टीचे संघटन बळकट करण्यासाठी आणि 'गाव तिथे कमळ' हे ध्येय साध्य करण्यासाठी सुरू असलेल्या “युवा ग्रामशक्ती संघटन” अभियानाला उमरखेड तालुक्यात प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. या अभियानांतर्गत ऊंचवड़द, दिघडी, खरूस बु., लोहरा, विडूळ, साखरा पोफाळी मुळावा आणि चालगणी अशा विविध गावांमध्ये भेटी देऊन युवकांशी थेट संवाद साधण्यात आला.युवा शक्तीचा हुंकार: प्रत्येक गावात सशक्त संघटन
भाजप प्रदेशाध्यक्ष मा. रविंद्र चव्हाण आणि युवा मोर्चा प्रदेशाध्यक्ष मा. कृष्णराज महाडिक यांच्या मार्गदर्शनाखाली हे अभियान राबवले जात आहे. ग्रामीण भागातील प्रत्येक तरुणापर्यंत पक्षाची विचारधारा आणि विकासाचा संदेश पोहोचविणे, हा या अभियानाचा मुख्य उद्देश आहे.
प्रमुख नेत्यांची उपस्थिती
मा. नितीनभाऊ भुतडा व लोकप्रिय आमदार मा. किसनरावजी वानखेडे यांच्या मार्गदर्शनाखाली भाजप युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष मा.रोहित भैया वर्मा यांच्या सक्षम नेतृत्वात हे दौरे पार पडले. यावेळी गावागावात नव्या सदस्य नोंदणीला वेग देण्यात आला असून, अनेक युवकांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे.
ग्रामस्तरावर संघटनात्मक बांधणी
या दौऱ्यांदरम्यान ग्रामस्तरावरील संघटनात्मक बांधणीसाठी ठोस पावले उचलण्यात आली. “प्रत्येक गावात युवाशक्ती संघटन – प्रत्येक घरात कमळ” ही संकल्पना प्रत्यक्षात उतरवण्यासाठी युवकांनी कंबर कसली आहे.
उपस्थित मान्यवर:
या प्रसंगी मा. संदीप भाऊ हिंगमीरे, मा. परमानंद पाटील कदम, मा. धनराज पाटील वानखेडे, मा. योगेश पाटील वानखेडे,धनंजय माने, मल्हार चंद्रे, ज्ञानेश्वर मांगरूळकर, देवा देवकत्ते,विनायक अक्कावार तसेच जिल्हा व स्थानिक स्तरावरील पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
”युवा शक्तीच्या एकजुटीतूनच गावाच्या विकासाचा मार्ग मोकळा होईल. उमरखेड तालुक्यातील तरुणांचा उत्साह पाहता आगामी काळात भाजपचे संघटन अधिक मजबूत होईल,” असा विश्वास यावेळी जिल्हाध्यक्ष रोहित भैया वर्मा यांनी व्यक्त केला.











