विजय कदम (लोकहित लाईव्ह न्युज संपादक)
उमरखेड येथील महात्मा ज्योतिबा फुले विद्यालयातील वर्ग आठवी मधील १२१ विद्यार्थी राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक(NMMS) विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती परीक्षेत सत्र २०२५-२६ मध्ये उत्तीर्ण झाले.
साडेतीन लाखापेक्षा कमी उत्पन्न असणाऱ्या पालकांच्या विद्यार्थ्यास या परीक्षेत प्रविष्ट होता येते.
” सातत्य नियोजन सराव व योग्य मार्गदर्शन नियमित परीक्षा व निकाल प्रेरणा या गोष्टी कोणत्याही क्षेत्रात यश मिळवण्यासाठी आवश्यक असतात” असे गौरवोद्गार विद्यालयाचे मुख्याध्यापक यांनी या यशा नंतर व्यक्त केले.
मागील शैक्षणिक क्षेत्रामध्ये ११८ विद्यार्थी सदर परीक्षेत उत्तीर्ण झाले होते.
योग्य नियोजनामुळे विद्यालय सातत्याने प्रगतीचा चढता आलेख गाठत आहे.
विद्यालयातील सर्व शिक्षक वृंद व शिक्षकेतर कर्मचारी वृंद प्रमोदराव देशमुख व पर्यवेक्षक राने सर यांच्या मार्गदर्शनाखाली दिलेले नियोजन करून काम करत आहेत.
या परीक्षेसाठी शिष्यवृत्ती चे मार्गदर्शक पृथ्वीराज पतंगे यांनी जवळपास २० सराव परीक्षा सातत्याने घेऊन
विद्यालयाच्या प्रगतीचा आलेख उंचाविला विद्यालयातून कु. प्राप्ती गजानन शिंदे हिने १३८ गुण प्राप्त करून प्रथम क्रमांक मिळवला तर गोपाल जांबुवंत वानखेडे, द्वितीय क्रमांक १३४ गुण तृतीय क्रमांक श्रुती दगडू जाधव १२७ गुण चतुर्थ क्रमांक हसनेन खान १२५ व पाचवा क्रमांक गौरी विशाल माने १२४ यांनी पटकाविला
वरील परीक्षेमध्ये घवघवीत यश मिळवण्यासाठी दर शनिवारी रविवारी सराव परीक्षा व लगेच निकाल देण्यात आला.
परीक्षेमधील पात्र विद्यार्थ्यांना नववी ते बारावी दरमहा १००० रुपये शिष्यवृत्ती देण्यात येत असते. पात्र विद्यार्थ्यांना जवळपास ४८ हजार रुपये शिष्यवृत्ती बारावीपर्यंत मिळत असते.
या यशामध्ये पालकांनी सुद्धा बरीच मेहनत घेतली.
अशा प्रकारच्या परीक्षा विद्यालयामध्ये आयोजित केल्यास भविष्यातील विविध स्पर्धा परीक्षांमध्ये यश मिळू शकते असा आशावाद विद्यालयाचे मुख्याध्यापक देशमुख सर यांनी व्यक्त केला.
महात्मा ज्योतिबा फुले विद्यालय हे सर्व गुण संपन्न व्यक्तिमत्त्वासाठी विविध परीक्षेचे आयोजन करत असते.
या अभूतपूर्व यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष राम देवसरकर साहेब , संस्थेचे सचिव डॉ.या.मा.राऊत साहेब यांनी विद्यालयाचे मुख्याध्यापक पर्यवेक्षक सर्व शिक्षक वृंद व कर्मचारी व गुणवंत विद्यार्थ्यांचे अभिनंदन व कौतुक केले आहे आणि भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.













