विजय कदम (लोकहित लाईव्ह न्युज संपादक)
शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, उमरखेड येथे ७७ वा प्रजासत्ताक दिन अत्यंत उत्साहात व गौरवपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून व विद्यार्थ्यांच्या सामूहिक संविधान उद्देशिका वाचनाने करण्यात आली.यानंतर “विविधतेतून एकता” या संकल्पनेवर आधारित विद्यार्थ्यांनी विविध राज्यांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या पारंपरिक वेशभूषा अत्यंत सुंदरपणे साकार केल्या. या वेशभूषा सादरीकरणाने उपस्थितांची विशेष दाद मिळवली.कार्यक्रमादरम्यान विद्यार्थ्यांनी प्रजासत्ताक दिनाच्या महत्त्वावर उत्स्फूर्त भाषणे केली, तर विद्यार्थिनींनी देशभक्तीपर गीतांचे सादरीकरण करून वातावरण देशभक्तीने भारावून टाकले.या प्रसंगी संस्थेचे प्राचार्य डी. पी. पवार यांनी मार्गदर्शनपर भाषणात देशाच्या उज्वल भविष्यासाठी युवकांची भूमिका अत्यंत महत्त्वाची असल्याचे सांगितले. त्यांनी प्रजासत्ताक दिनाचे ऐतिहासिक महत्त्व तसेच भारतीय संविधान अमलात येण्यामागील घटना सविस्तरपणे स्पष्ट केल्या.लाभलेले प्रमुख अतिथी सेवानिवृत्त शिल्प निदेशक श्री. कुंठे सर तसेच आय.एम.सी. सदस्य श्री. सुनील चेके सर यांनीही प्रशिक्षणार्थ्यांना प्रजासत्ताक दिनानिमित्त प्रेरणादायी संबोधन केले व भविष्यातील संधींबाबत मार्गदर्शन केले.प्राचार्य पवार यांनी वेशभूषा संकल्पनेत सहभागी झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे विशेष कौतुक करून त्यांचे अभिनंदन केले. या कार्यक्रमात शिक्षकवर्ग, कर्मचारीवर्ग व सर्व विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवून कार्यक्रम यशस्वीरीत्या पार पाडला.कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी प्रभारी गटनिदेशक श्री. कुंभारे सर, श्री. निंबोळकर सर, श्री. नरवाडे सर, श्री. थोबले सर, श्री. चिंचाळे सर, श्री. कदम सर, श्री. गायकवाड सर, शेख सर, सोनुळे सर, भोसले सर, तसेच एस. डी. मॅडम, एम. डी. नरवाडे मॅडम, निंबेकर मॅडम, मयूर सर यांनी विशेष परिश्रम घेतले.अशा प्रकारे शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, उमरखेड येथे प्रजासत्ताक दिन अत्यंत सुंदर, शिस्तबद्ध व प्रेरणादायी वातावरणात संपन्न झाला.











