विजय कदम (लोकहित लाईव्ह न्युज संपादक)
कुमार चिंता (भा.पो.से.) पोलीस अधिक्षक यवतमाळ यांनी पो. स्टे. हद्दीत चोरी सारखे गुन्हे उघडकीस आणण्या करिता पो. स्टे. स्तरावर कौशल्यपुर्वक तपास करुन गुन्हे उघडकीस आणण्या बाबत आदेशीत केले होते.त्या अनुषंगाने पोलीस स्टेशन पोफाळी येथे दिनांक 26/02/2026 रोजी 13/15 वा. फिर्यादी नामे सौ. सविता शालीकराम गडवे, रा.सुभाष वार्ड पुसद यांनी पोलीस स्टेशन पोफाळी येथे माहिती दिली की, शेगांव उमरखेड बसमध्ये पुसद ते पोफाळी प्रवास करीत असतांना प्रवासादरम्यान कोणीतरी अज्ञात चोरट्याने 15 ग्रॅम वजनाची गहु मण्याची सोण्याची पोत किंमत 2,10,000/- रुपयाचा मुद्देमाल चोरुन नेला अशी फिर्याद दिली होती.सदर घटनेचे गांभीर्य ओळखुन पोलीस स्टेशन पोफाळीचे पथकाने तसेच वाहतुक शाखा उमरखेडचे पथकाने तात्काळ शेगांव उमरखेड जाणा-या बसचा पाठलाग करुन सदर बस बेलखेड फाटा उमरखेड जवळ थांबवुन बसची बारकाईने पाहणी करुन सदर बसमध्ये प्रवास करीत असलेल्या महीलांची महीला पोलीस अंमलदार यांचेकडुन तपासणी केली असता बसमधील सोबत असलेल्या दोन महीला पैकी एका महीले जवळ फिर्यादी यांची चोरीस गेलेली 15 ग्रॅम वजनाची गहु मण्याची सोण्याची पोत किंमत 2,10,000/- रुपयाचा मुदेमाल मिळुन आला वरुन सदर महीलांना महीला पोलीस अंमलदार यांचेकडुन ताब्यात घेवुन पुढील कारवाई करिता पोलीस स्टेशन पोफाळी येथे आणले .
सदरची कारवाई कुमार चिंता पोलीस अधिक्षक यवतमाळ, अशोक थोरात अपर पोलीस अधिक्षक यवतमाळ, हनुमंत गायकवाड उपविभागीय पोलीस अधिकारी उमरखेड,. यांचे मार्गदर्शनाखाली, निलेश शेंबडे ठाणेदार पोलीस स्टेशन पोफाळी,स.पो.नि.अमोल गुंडे, प्रभारी वाहतुक उपशाखा उमरखेड पो.उप.नी. सुरेश शिंदे, पो.हवा. शिवाजी पवार, पो.काँ. हिम्मत बंडगर, पो.कॉ.पवन चंदेवाड, पो.काँ. शिवाजी चंद्रवंशी म.पो.काँ. सिमा इंगळे, म.पो.का. निलम श्रीवास चालक स.फौ. फिरोज काझी चालक पो.काँ. नागेश वास्टर यांनी पार पाडली.












