विजय कदम (लोकहित लाईव्ह न्युज संपादक )
हिमायतनगर तालुक्यात सार्वजनिक बांधकाम विभागाकडून अनेक रस्ते बोगस करण्यात आले आहेत. या बोगस कामांविषयी अनेक तक्रारी आल्या. परंतु हिमायतनगर सार्वजनिक बांधकाम विभागातील अभियंते यांचा मनमानी करभार चालू आहे. तालुक्यात चांगले रस्ते व्हावी अशी नागरीकांची इच्छा आहे. पण अभियंत्यांनी केवळ आपल भलं कसं करता येईल याकडेच त्यांच लक्ष आहे.
तालुक्यातील नुकताच बोरगडी ते धानोरा रस्त्याचे डांबरीकरणाचे काम अतिशय निकृष्ट दर्जाचे करण्यात आले आहे. या रस्त्याची गुणनियंत्रण विभागाकडून सखोल चौकशी करून लेखा परिक्षण अहवाल देण्यात यावा अशी मागणी केली होती. पण सार्वजनिक बांधकाम विभागाने ती तक्रार कचराकुंडीत टाकून दिल्याने आज दि. २७ जानेवारी २०२६ रोजी सार्वजनिक बांधकाम विभागीय कार्यालय भोकर येथे तक्रारदार माधव काईतवाड, विजय वाठोरे, गंगाधर गायकवाड, दाऊ गाडगेवाड यांनी आमरण उपोषणास सुरूवात केली आहे.
यावेळी हिमायतनगर तालुक्यातील जिल्हा सिमा वारंगटाकळी-धानोरा-बोरगडी-हिमायतनगर- टेंभी-आंदेगाव-वाळकेवाडी-दुधड- या रस्त्याच्या मजबुतीकरण व डांबरीकरण तसेच दुरूस्तीचे गुणनियंत्रणामार्फत समिती गठीत करून तक्रारदारासमोर तपासणी करण्यात यावी. तसेच सदरील कामाचे लेखा परिक्षण अहवाल देण्यात यावा. दोषी अभियंत्यांना तात्काळ सेवेतून बडतर्फ करण्यात यावे यासाठी आमरण उपोषण सुरू केले आहे.












