विजय कदम (लोकहित लाईव्ह न्युज संपादक))
यवतमाळ जिल्ह्यातील पैनगंगा नदीवरील सहस्त्रकुंड बांधण्यात ताडपत्रीत गुंडाळलेल्या अवस्थेत मृतदेह आढळला होता.तब्बल महिन्याभरानंतर या बहुचर्चित खूनाचा पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. अतिमद्यप्राशन करून भाजी ‘बेचव’ झाल्याच्या क्षुल्लक कारणावरून झालेल्या वादातून, पत्नी आणि मुलानेच मिळून पतीचा खुन केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केवळ ‘सिटी मेन्स टेलर’च्या लेबलवरून या गुन्ह्याचा छडा लावत दोन्ही आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत
मारोती गंगाराम डुकरे (६०) रा. जलदरा, पोस्ट इस्लापूर, ता. किनवट, जि. नांदेड असे मृतकाचे नाव आहे. तर मुलगा प्रदीप मारोती डुकरे (२५)
आणि पत्नी पार्वताबाई मारोती डुकरे असे मारेकरी दोघांची नावे आहेत. बिटरगाव पोलीस स्टेशन हद्दीतील पैनगंगा नदीवरील सहस्त्रकुंड बंधाऱ्यात ९ जानेवारी रोजी ताडपत्रीत बांधलेले, कुजलेल्या अवस्थेत अनोळखी मृतदेह आढळला होता. मृतदेहाची ओळख पटवणे पोलिसांसमोर मोठे आव्हान होते. यवतमाळ पोलीस अधीक्षकांनी या प्रकरणाचे गांभीर्य ओळखून तपासासाठी चार पथके तैनात केली होती. पोलीस अधीक्षकांनी तपासाचा आढावा घेतल्यानंतर घटनास्थळाच्या ५० किमी परिसरात शहानिशा तसेच हिंगोली, नांदेड व तेलंगणा राज्यातील निर्मल व आदिलाबाद जिल्ह्यांतील पोलीस पाटील यांच्याशी समन्वय साधून बेपत्ता व्यक्तींची माहिती संकलित करण्याच्या सूचना दिल्या. त्यानुसार गोपनीय माहिती संकलन, पूर्वइतिहास
तपासणी व संशयितांवर गोपनीय पाळत ठेवण्यात आली. यात इस्लापूर
पोलीस स्टेशन हद्दीतील जलदरा गावाचे पोलीस पाटील सुरेश वाघमारे यांनी मृतक मारोती गंगाराम डुकरे हे बेपत्ता असून मिसिंग नोंद नसल्याची माहिती
दिली. त्यानंतर तपासात मृतकाच्या कपड्यांबाबत विचारपूस केली असता संशयिताकडून उडवाउडवीची उत्तरे मिळाली. त्यामुळे पोलिसांचा संशय बळावला. पोलिसांनी आरोपींवर पाळत ठेवली. यात आरोपींच्या संशयास्पद हालचाली आढळून आल्या आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक कुमार चिंता, अपर पोलीस अधीक्षक अशोक थोरात, उपविभागीय पोलीस अधिकारी हनुमांत गायकवाड, स्थानिक गुन्हे शाखा पोलीस निरीक्षक सतीश चवरे यांचे मार्गदर्शनात साहाय्यक पोलीस निरीक्षक मनीष गावंडे, धिरज बांडे, पवन राठोड, पोलीस उपनिरीक्षक गजानन राजमलू, शरद लोहकरे, शे. साजीद, योगेश गटलेवार, मुन्ना आडे, संतोष भोरगे, अजय डोळे, प्रशांत हेडाऊ, योगेश डगवार, बबलू चव्हाण, रुपेश पाली, निलेश राठोड, तेजाब रणखांब,
सुभाष जाधव, रमेश राठोड, कुणाल मुंडोकार, ऋतुराज मेडवे, सचिन घुगे, मिथून जाधव, सोहेल मिझ, किशोर झेंडेकर, सुनिल पंडागळे, आकाश सूर्यवंशी, अमित झेंडेकर, देवेंद्र होले, सुनिल पैठणे, ममता देवतळे, पोलीस उपनिरीक्षक रविंद्र शिरागे, राजेश जाधव, अगित कुगरे यांसह स्थानिक गुन्हे शाखा, तसेच ठाणेदार बिटरगांव साहय्यक पोलीस निरीक्षक पांडुरंग शिंदे व पोलीस उपनिरीक्षक सागर अन्नमवार यांच्यासह पोलिसांनी केली, पोलिसांनी संशयिताच्या घराची झडती घेतली असता, मृतकाच्या कपड्यांवर आणि घरातील इतर कपडयांवर ‘सिटी मेन्स टेलर’ चे सारखेच शिलाई लेबल आढळले. या तांत्रिक पुराव्यामुळे संशय बळावला आणि पोलिसांनी पोलिसी खाक्या दाखवताच आरोपी प्रदीपने वडिलांची हत्या केल्याची कबुली दिली.











