

विजय कदम
(लोकहित लाईव्ह न्युज संपादक )
शनिवार दिनांक 15 नोव्हेंबर 2025 रोजी उमरखेड येथील वाहतूक शाखेचे वाहतूक निरीक्षक रोहित बेंबरे साहेब यांची प्रशासनाच्या आदेशानुसार बाभुळगाव येथे नुकतीच बदली झाली व त्यांनी आपल्या पदाचा कार्यभार अधिकृतरित्या दिग्रस येथील API अमोल गुंडे साहेब यांना उमरखेड येथील वाहतूक शाखा निरीक्षक या पदाचा पदभार सोपविला. त्यानंतर नवीन वाहतूक शाखा निरीक्षक अमोल गुंडे साहेब यांचे सर्व कर्मचाऱ्याकडून पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. गुंडे साहेब रुजू झाल्यानंतर त्यांनी वाहतूक शाखेतील अधिकारी व कर्मचाऱ्यांशी संवाद साधत वाहतूक शाखेतील समस्या जाणून घेऊन संवेदनशील पद्धतीने काम करण्याचा संकल्प केला.याप्रसंगी वाहतूक शाखेतील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.






