महागाव तालुका प्रतिनिधी
शरद गोभे
मुडाणा येथील अविनाश चेंडके यांच्या घराजवळ डीपी असून डीपीवर झालेल्या शॉटसर्कीट होऊन अचानक भीषण आग लागली आगीने काही वेळातच रौद्ररूप धारण केल्याने संपूर्ण घर जळून खाक झाले .
आग लागल्याची माहिती मिळताच गावातील नागरीकांनी धाव घेतली . तसेच तहसिलदार अभय मस्के साहेब व पोलिस प्रशासनाने घटनास्थळी दाखल होऊन अग्निशमन दल प्राचारण करून आग विझवण्यासाठी प्रयत्न केले . मात्र आगीचा वेग प्रचंड असल्याने सर्व प्रयत्न निष्फळ ठरले .
या आगीत घरातील संपूर्ण संसारोपयोगी साहीत्य, धान्य व मौल्यवान वस्तू , मंडप सजावटीचे साहित्य जळून भस्मसात झाल्याने चेंडके कुंटुंब उघड्यावर आले आहे या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे .












