महागाव तालुका प्रतिनिधी शरद गोभे
समता हॉलीबॉल क्लबच्या वतीने मुडाणा येथे आयोजित कॉस्कोबॉल स्ट्रोक पद्धतीने हॉलीबॉल संघाचे उद्घाटन शनिवारी महागाव पोलीस स्टेशनचे ठाणेदार श्री धनराज निळे साहेब, ,दत्ता बापू वडद, हभप .तानाजी महाराज व महेश्वर भारती महाराज व प्रतिष्ठीत मान्यवराच्या हस्ते झाले यामध्ये अनेक ठिकाणचे संघ सहभागी झाले आहेत मुडाणा येथील नाना नगरी मध्ये होत असलेल्या या सामन्याचा समारोप 11 जानेवारी रोजी होणार आहे स्पर्धेची पहिले बक्षीस वीस हजार एक रुपये, दुसरे बक्षीस पंधरा हजार रुपये, तिसरे बक्षीस दहा हजार रुपये व चौथी बक्षीस पाच हजार रुपये असे बक्षीस जाहीर करण्यात आले आहे, बाहेरगावच्या खेळाडूंची भोजनाची व निवास स्थानाची व्यवस्था आयोजकांनी केली आहे ,या सामन्याकरिता व्यापारी संघटना , डॉक्टर , मेडीकल संघटना,युनियन बँक ऑफ इंडिया शाखेचे सहकार्य व गावकऱ्यांचे सहकार्य लाभत आहे या आयोजनासाठी समता हॉलीबॉल क्लबचे पदाधिकारी पुढाकार घेत आहेत .













