उमरखेड तालुक्यातील चातारी येथे शनिवार दिनांक 15 नोव्हेंबर 2025 रोजी आदिवासी समाजाचे आराध्य दैवत क्रांतिवीर भगवान बिरसा मुंडा यांची 150 वी जयंती अति उत्साह साजरी करण्यात आली. या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदिवासी समाजाचे नेते माजी आमदार उत्तमराव इंगळे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून उमरखेड महागाव विधानसभेचे आमदार किसनराव वानखेडे होते.यावेळी भाजपा जिल्हा मंत्री परमानंद पाटील कदम, पोलीस पाटील सतीश कदम, सरपंच सौं रंजनाताई माने, शिवाजीराव माने,बापूराव माने सर,तंटामुक्ती अध्यक्ष श्रीधर पाटील माने, माधवराव पिलवंड, चंद्रकांत पवार, डॉ. जयकुमार माने, माजी सरपंच भगवान माने, डॉक्टर घुटेताई, विलास पसलवाड, विनोद कन्नावार,व अनेक मान्यवर पंचावर उपस्थित होते.आमदार किसनराव वानखेडे व माजी आमदार उत्तमराव इंगळे यांचे शुभ हस्ते भगवान बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेचे पूजन करून मान्यवरांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.उपस्थित सर्व मान्यवरांचे शाल व पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. त्यानंतर माजी आमदार उत्तमराव इंगळे,आमदार किसनराव वानखेडे,शिवाजीराव माने, भालचंद्र वाठोरे,यांनी भगवान बिरसा मुंडा यांच्या जीवन चारित्र्याविषयी माहिती सांगितली. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक राजेश कदम तर सुत्र संचलन प्रणव पवार यांनी केले. हा मंचावरील कार्यक्रम झाल्यानंतर सर्व बांधवांनी खिचडीचा आस्वाद घेतला आणि चातारी येथील प्रमुख रस्त्याने दंडारणे,सांस्कृतिक वाद्यांनी भगवान बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेची भव्य मिरवणूक काढण्यात आली.भगवान बिरसा मुंडा यांच्या जयंतीचा संपूर्ण कार्यक्रम घडवून आणण्याकरिता क्रांतीसुर्य बिरसा मुंडा क्रांतीदल अध्यक्ष दशरथ भिसे,गणेश कुरोडे, बाबुराव भिसे, पत्रकार राजेश कदम, प्रणव पवार, पत्रकार विजय कदम,अशोक माहुरे, किसन शेळके,प्रकाश भिसे,राजू राजने, दत्ता टिळेवाड,अरविंद भिसे,सोनबा आढाव,श्रावण कुरोडे, समाधान शेळके,बाळू रणमले व समस्त क्रांतीसुर्य बिरसा मुंडा मंडळ यांनी परिश्रम घेतले. यावेळी चातारी येथील संपूर्ण आदिवासी बांधव,महिला,युवक, युवती, मोठ्या संख्येने उपस्थित होते.






