विजय कदम (लोकहित लाईव्ह न्युज संपादक )
भारतीय संविधान जगाला मार्गदर्शक ठरत आहे राष्ट्रीय एकता आणि अखंडता अबाधित करा राखण्यासाठी संविधानाचे पालन करण्यासाठी नितांत गरज आहे असे प्रतिपादन हुतात्मा मधुकर चौधरी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था उमरखेड चे प्राचार्य माननीय श्री डीपी पवार साहेब यांनी केले.
हुतात्मा मधुकर चौधरी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था येथे
जगातील सर्वश्रेष्ठ समजल्या जाणाऱ्या भारतीय राज्यघटनेचे महत्त्व अधोरेखित करणारा संविधान दिन विविध उपक्रमांनी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
संस्थेचे प्राचार्य श्री डी.पी. पवार साहेब पुढे म्हणाले सर्वश्रेष्ठ भारतीय संविधान जगाला मार्गदर्शक ठरत आहे स्वातंत्र समता बंधुता व न्याय या मूल्यामुळे धर्मनिरपेक्ष समाजवादी लोकशाही गणराज्य म्हणून भारताकडे पाहिले जात आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्वतंत्र्याचा आग्रह मानवतेची प्रतिष्ठा व सामाजिक विषमतेचा निषेध करणारे विचारधारा संविधानाद्वारे जगासमोर मांडली. प्रथम डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन संस्थेचे प्राचार्य श्री डी.पी. पवार साहेब व श्री ये.डी. कुंभार सर शिवानंद निंबाळकर सर किरण पाटील सर मनीषा नरवाडे मॅडम तसेच अश्विनी निम्मेकर यांच्या हस्ते केले. यावेळी निबंध व वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन केले होते . कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे श्री येडी कुंभारे सर यांनी संविधानाची गरज आणि महत्त्व याबाबत मार्गदर्शन केले व त्यानंतर प्रशिक्षणार्थ्यांनी व संस्थेतील सर्व कर्मचाऱ्यांनी संविधानाची सामूहिक शपथ देण्यात आली. शिवानंद निबोलकर सर व किरण पाटील सर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री बी एस नरवाडे यांनी केले व कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन शिवानंद निमळकर सर यांनी केले.यावेळी संविधानाचा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी गौरव चिंचाळे सर मयूर कुंभार शेख हर्षद, गुट्टे सर व पंकज शिरसाट सर गोदाजी पोपुलवाड व दिलीप धुळे यांनी परिश्रम घेतले






