नगरसेवक पदाचे अधिकृत उमेदवार स्वातीताई पाचकोरे प्रभाग क्रमांक ६ मधून बाजी मारणार
उमरखेड नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक २०२५
भारतीय जनता पार्टी ,राष्ट्रवादी काॅंग्रेस ,रिपाई (आठवले गट) ,सत्यशोधक शेतकरी संघ महायुती नगरसेवक पदाचे अधिकृत उमेदवार स्वातीताई गजानन पाचकोरे प्र.क्र. ६ मधुन बाजी मारणार ! निवडणुकीसाठी २६ नोव्हेंबरला चिन्हाचे वाटप झाले .२७ तारखेपासून प्रचाराचा खरा वणवा पेटला .घराघरांत भेटी ,मिरवणूका पोस्टर -बॅनर ,पत्रके अशा माध्यमांतून उमेदवारांनी प्रचार सुरु केला आहे .प्रचाराचा जल्लोष चारच दिवसात उत्कर्षबिंदूला पोहोचला असून आता एक डिसेंबर रोजी रात्री १० वाजता पर्यंत प्रचार धुमधडाका संपणार आहे .
भाजपतर्फे प्रभाग क्र. ६ मधील उमेदवार स्वातीताई पाचकोरे ,प्रशांत उर्फ विजय हरडफकर हे आहेत . तर उमरखेड जनशक्ती पॅनलतर्फे कविताताई काळबांडे ,सुरेश कदम हे नशिब आजमावत आहेत. या प्रभागात स्वातीताई पाचकोरे निवडणूक जिंकणार असा अंदाज आहे . कारण या ठिकाणी स्वातीताईचे पती गजानन पाचकोरे यांची विकास कामे व जनसंपर्क चांगला आहे . स्वातीताई प्रभागातील सर्वंच परिवारात प्रसिद्ध असून ,त्यांची कामे चांगली आहेत . व जनतेप्रती त्यांची धडपड पाहता ,सर्वत्र स्वातीताई पाचकोरे यांच्या नावाची चर्चा असून ,याळेसच्या निवडणुकीत ते बाजी मारणार असा अंदाज मतदारांचा आहे.
स्वातीताई यांच्या प्रचार कामी दिग्गज नेते रस्त्यावर उतरले आहेत .भाजपतर्फे नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार निधीताई नितीनजी भुतडा आहेत. प्रचाराला रंगत आणण्यासाठी आमदार किसनराव वानखेडे,माजी आ. उत्तमराव इंगळे ,माजी,आ.प्रकाश पाटील देवसरकर,माजी, आ. विजयराव खडसे ,माजी,आ. नामदेवराव ससाने ,भाजप जिल्हा समन्वयक नितीन भाऊ भुतडा ,महेश काळेश्वरकर, प्रा.विजय गुजरे सर ,बळवंतराव नाईक ,माजी उपाध्यक्ष अरविंद भोयर, अजय बेदरकर सर, डाॅ. जयशंकर जवने , शहराध्यक्ष अतुल खंदारे , सुरेश वैष्णव ,बाळासाहेब भट्टड , अरविंद धबडगे, गजानन मोहळे , अश्विन कन्नावार , रायेवार वकील ,नितीन माहेश्वरी, अजय माहेश्वरी,बालाजी उदावंत, वकील माने साहेब हे प्रमुख पक्षाचे दिग्गज नेते फील्डवर उतरले आहेत.प्रत्येक नेत्याची त्यांच्या प्रभागातील उमेदवाराला विजय मिळवून देण्याची प्रतिष्ठा पणाला लागली आहे . प्रचारासाठी कमी दिवस मिळाल्याने उमेदवारांसह पक्षांचे कार्यकर्ते जिवाचे रान करून प्रचारात उतरले आहेत. नगराध्यक्ष पदासाठी भाजपतर्फे निधीताई भुतडा ,उमरखेड जनशक्ती पॅनलकडून तेजश्रीताई जैन,शिंदे सेनेकडून शारदा ताई जाधव, राष्ट्रवादी (श.प.) पक्षाचे सरोजताई देशमुख, एमआयएमकडून सय्यद शमीम बी युसुफ या अधिकृत पक्षाच्या उमेदवार आहेत. सुरुवातीला वाटत होते की निवडणूक पंचरंगी होईल .परंतू नगराध्यक्ष पदाची निवडणूक तिरंगी होणार असा जाणकारांचा अंदाज आहे.
स्वातीताई पाचकोरे यांनी मतदारांना आश्वासन दिले आहे की,माझ्या प्रभागाचा सर्वांगीण विकास वृद्धींगत होण्या हेतुने काम करण्याची आंतरीक तळमळ आहे .मी प्रभागातील उर्वरित रस्ते ,नाल्या शैक्षणीक ,आरोग्य व इतर मुलभुत सुविधा निर्माण करुन देण्याकरीता वचनबद्ध आहे.प्रभाग क्र. ६ मधील आढावा घेतला असता , याठिकाणी स्वातीताई पाचकोरे हे बाजी मारणार असल्याचे बोलल्या जात आहे.












