विजय कदम (लोकहित लाइव न्युज संपादक)
उमरखेड येथे महिंद्रा प्राइड क्लासरूम आणि नांदी फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने दहा दिवसाचे प्रशिक्षणार्थ्यांना प्रशिक्षण मोफत दिले. या प्रशिक्षणामध्ये इलेक्ट्रिशियन वायरमन मोटर मेकॅनिकल डिझेल मेकॅनिकल कोपा ड्रेस मेकिंग व बेसिक कॉस्मेटोलॉजी या ट्रेडच्या सर्व मुलींना या दहा दिवसाच्या प्रशिक्षणामध्ये लाईफ स्किल सॉफ्ट स्किल, बॉडी लँग्वेज, प्रोफेशनल ग्रूमिंग, गुड हेल्थ गुड लाईफ गोल सेटिंग अँड टाईम मॅनेजमेंट रिझुम प्रेपरेशन , प्रेपरिंग फॉर इंटरव्यू ,जॉब opportunity , presenting for project group discussion work place ethics professional communication critical thinking money management problem solving, stress management ,emotion intelligence ,art of speaking स्पिकिंग या विषयावर प्रशिक्षणार्थाना स्वतःच्या भावना , मूल्याची ओळख करून देणे विद्यार्थ्यांना व्यावसायिक प्रतिमेसाठी देहबोली आणि आरोग्य पूर्ण जीवनशैलीचे महत्त्व समजावे व शारीरिक मानसिक भावनिक आरोग्याची सवय असावी त्यानंतर आपला रिझुम कसा तयार करावा , मुलाखतीमध्ये विचारले जाणाऱ्या प्रश्नाचे उत्तरे कशी द्यावी तसेच व्यवसायिक संवाद कौशल्य कसे प्रकारे विकसित करावे बिजनेस वातावरणामध्ये रचनात्मकपणे संघर्ष कशा पद्धतीने सोडवता येईल या विषयावर विद्यार्थ्यांना प्रशिक्षण दिले व तसेच सेविंगची ही संकल्पना त्यांना सांगितली व्यावसायिक डिजिटलची ओळख कशाप्रकारे करायची हे सुद्धा त्या प्रशिक्षणामध्ये शिकवण्यात आले.तसेच सॉफ्ट स्कील मध्ये स्वतःच्या भावना ओळखणे समजून घेणे आणि व्यवस्थापित करणे व इतरांच्या भावना कशा प्रकारे समजून घ्यावे त्यानंतर आर्ट स्पिकिंग मध्ये स्पष्ट आणि आत्मविश्वासाने बोलण्याचे कौशल्य कशाप्रकारे विकसित करावी हे सुद्धा या प्रशिक्षणामध्ये शिकवण्यात आले. या प्रशिक्षणामध्ये प्रशिक्षणार्थ्यांचा सेल्फ कॉन्फिडन्स ची लेव्हल वाढल्याचे प्रशिक्षणामध्ये दिसून आले. हे प्रशिक्षण ट्रेनर म्हणून आलेले हिमांशू सर यांनी सर्व प्रशिक्षणार्थ्यांनी प्रशिक्षण चांगल्या प्रकारे दिले व अशाच प्रकारे असे महिंद्रा प्राइड क्लासरूम व नांदी फाउंडेशन तर्फे कार्यक्रम राबवावे जेणेकरून विद्यार्थ्याचे भविष्य उज्वल होईल,असे प्रतिक्रिया संस्थेचे प्राचार्य श्री डी.पी. पवार यांनी दिले. प्रशिक्षणाच्या शेवटच्या दिवशी समारोप कार्यक्रम ठेवण्यात आला या कार्यक्रमांमध्ये संस्थेचे प्राचार्य श्री डी.पी. पवार साहेब अध्यक्ष होते व प्रमुख अतिथी म्हणून ये डी कुंभारे , श्री.एस.बी इंगोले सर,मनीषा नरवाडे ,मॅडम अश्विनी निमेकर मॅडम ,सपना नरवाडे,मॅडम व गौरव चिंचाळे सर, हे होते व कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री बीएस नरवाडे यांनी केले व आभार प्रदर्शन मयूर कुंभारे यांनी केले












