नगरपरिषद निवडणुकीचा प्रचार एक दिवस वाढला असून आजरोजी प्रचाराची रणधुमाळी असणार आहे . भारतीय जनता पार्टी ,राष्ट्रवादी काॅंग्रेस ,रिपाई आठवले गट ,सत्यशोधक शेतकरी संघ महायुतीचे नगराध्यक्ष पदाचे अधिकृत उमेदवार निधीताई नितीनजी भुतडा , माजी नगरसेविका वंदनाताई घाडगे , सविताताई पाचकोरे सह भाजपचे २४ उमेदवार निवडणूक मैदानात उभे आहेत.वंदनाताई घाडगे ह्या माजी बांधकाम सभापती होत्या तर सविताताई पाचकोरे सुद्धा माजी नगरसेविका आहेत . घाडगे व पाचकोरे परिवाराचे शहरातील सर्व कुटुंबासोबत जिव्हांळ्यांचे संबंध आहेत. सचिन भाऊ घाडगे यांचा मराठा आंदोलनात सिंहाचा वाटा होता. त्यावेळी नेमकीच मराठा आंदोलनाची मशाल पेटावयास सुक्षरुवात झाली असतांना ,सचिन भाऊ घाडगे यांनी मराठा समाजाचा सर्वांगिन विकास व्हावा व शिक्षण घेणार्या मुलासाठी आरक्षण कसे महत्वाचे आहे ? हा मुद्दा लावून धरला होता*.
प्रभाग क्र. ०५ मधील आरक्षण सर्वसाधारण प्रभागातुन असून असून *उमरखेड नगरपरिषद मध्ये यावेळेस ‘महिला राज’ असणार आहे. नगराध्यक्ष पदाचे आरक्षण सर्वंसाधारण महिलेसाठी असून भाजपकडून नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार निधीताई भुतडा या आहेत . निधीताई या सरळ साध्या स्वभावाच्या असून उमरखेड शहरातील घराघरात त्यांची ओळख आहे* . प्र.क्र. ०५ मध्ये इंदिरा नगर ,गोरोबा नगर ,चरडे नगर, जि.प.काॅलनी पाटील नगर हा परिसर आहे . वंदना ताई घाडगे या बांधकाम सभापती असतांना त्यांची कामगिरी चांगली ठरली आहे. त्यांनी प्रभागातील सर्वं जनतेच्या कामाला महत्व देत सुखा दुःखात मदतिचा हात दिला आहे. सविताताई पाचकोरे भाजप पक्षाच्या सक्रीय कार्यकर्त्या असून त्या प्रत्येक कार्यांत सहभागी असतात . नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार निधीताई भुतडा तर सदर प्रभागात वंदनाताई घाडगे व सविताताई पाचकोरे बाजी मारणार अशी चर्चा मतदारामध्ये आहे .












