विजय कदम (लोकहित लाईव्ह न्युज संपादक )
हुतात्मा मधुकर चौधरी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, उमरखेड येथे भारतीय संविधानाचे शिल्पकार आणि मानवमुक्तीचे योद्धा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६९ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त शोकभावपूर्ण वातावरणात अभिवादन कार्यक्रम आयोजित करण्यात आला. दिवसाच्या प्रारंभी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून उपस्थितांनी त्यांना विनम्र श्रद्धांजली अर्पण केली. सभागृहात क्षणभर स्तब्धता पसरली आणि सर्वांनी आदरपूर्ण शांततेत महामानवांना स्मरण केले.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे प्राचार्य डी. पी. पवार सर होते. त्यांनी आपल्या भाषणात डॉ. आंबेडकरांच्या विचारांची शाश्वत प्रेरणा अधोरेखित केली. “प्रज्ञा, करुणा आणि समता ही बाबासाहेबांनी दिलेली मूल्ये आजही समाजाला दिशा देतात. विद्यार्थ्यांनी त्यांचा विचार अंगीकारून समाजाच्या उन्नतीसाठी काम करावे,” असे आवाहन त्यांनी केले.त्यानंतर संस्थेचे प्रभारी गटनदेशक ऐ.डी. कुंभारे सर यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या कार्याचा आढावा घेतला. त्यांनी भारतीय समाजासाठी आंबेडकरांनी केलेल्या ऐतिहासिक योगदानाची उजळणी करून त्यांच्या विचारांनी सामाजिक न्यायाची ज्योत प्रज्वलित केल्याचे सांगितले.या कार्यक्रमाचे नियोजन तारतंत्री या व्यवसायाचे विद्यार्थी कुलदीप खेडकर यांनी केले होते. संविधान, लोकशाही आणि आंबेडकरांचे योगदान यावर त्यांनी प्रभावी प्रकाश टाकला. कार्यक्रमाला संस्थेतील विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते आणि व्यासपिठावर, भावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते महापरिनिर्वाण दिन कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शिल्पनिदेशक किरण पाटील सर, शिवानंद निंबोळकर सर, गायकवाड सर, आशिष नारनवरे सर, बी. एस. नरवाडे सर, के. एस. शिंदे सर, शेख अर्शद सर, गौरव चिंचाळे सर, सपना नरवाडे मॅम, मनीषा नरवाडे मॅम, अश्विनी निमेकर मॅम, पंकज कदम सर, मयूर कुंभारे सर, ऋषिकेश भागवत सर, आदित्य भोसले सर, उमेश सोनवणे सर, विजय धुमाळे सर, पंकज शिरसाट सर, शिवाजी कुठे सर, तसेच गोदाजी पोपुलवाड व दिलीप धुळे यांनी परिश्रम घेतले.कार्यक्रमाच्या शेवटी सर्व प्रशिक्षणार्थी व कर्मचाऱ्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना सामूहिक पुष्पांजली अर्पण करून, समाजासाठी त्यांचे अमूल्य योगदान कृतज्ञतेने स्मरले. भावपूर्ण वातावरणात कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.












