विजय कदम (लोकहित न्यूज संपादक )
दिनांक 09/06/2025 रोजी पोलीस स्टेशन उमरखेड फिर्यादी जि. यवतमाळ यांचे फिर्यादीवरुन उमरखेड पोलीस स्टेशन अप क्रमांक 444/2025 कलम 109 (1), 189 (2), 189(4), 191(2), 191(3), 190 भान्यांस सह कलम 135 महाराष्ट्र पोलीस अधिनियम सह कलम 4, 25 भारतीय हत्यार कायदा प्रमाणे गुन्हा दाखल झाला होता, गुन्हा दाखल झाल्यापासुन सदर गुन्ह्यातील आरोपी हा फरार होता. सदर गुन्ह्यातील नऊ आरोपी यांना यापुर्वी अटक केली आहे.
मा.पो नि सा यांचे मार्गदर्शनाखाली डिटेक्शन बॅच चे प्रमुख पोउपनि सागर इंगळे व डि बी टिम यांनी गोपनिय बातमीदारामार्फत माहिती काढून तसेच सायबल सेल, यवतमाळ यांचे मदतीने सदर गुन्ह्यातील गुन्हा घडल्यापासुन फरार असलेला पाहिजे आरोपी नामे आकाश रविप्रसाद दिक्षीत, वय-24 वर्ष, रा.शिवाजी वार्ड, उमरखेड ता. उमरखेड जि. यवतमाळ यास दि. 07/12/2025 रोजी सायंकाळी त्याचे शेतातून गोपनिय माहीती मिळालेल्या ठिकाणी जावून पोलीस कौशल्याचा वापर करुन अतिशय शिताफीने त्याचा पाठलाग करुन ताब्यात घेवून सदर गुन्ह्यात अटक केली आहे.
सदर कारवाई यवतमाळ पोलीस अधीक्षक श्री कुमार चिंता साहेब, मा. अप्पर अधिक्षक श्री अशोक थोरात साहेब, उपविभागीय पोलीस अधिकारी श्री हनुमान गायकवाड सा., पोलीस निरीक्षक शंकर पांचाळ सा., मा. पोलीस निरीक्षक यशोधरा मुनेश्वर सा., सायबर सेल यवतमाळ, यांचे मार्गदर्शनाखाली डि बी प्रमुख पोउपनि सागर इंगळे, ASI/1186 मधुकर पवार, पोशि/1652 संघशिल टेंभरे, पोशि/1681 गिरजप्पा मुसळे, पो.स्टे. उमरखेड तसेच पोशि/ 184 अमित पसले, पोशि/1730 किसन राठोड सायबर सेल यवतमाळ यांनी यशस्वीरित्या पार पाडली आहे.












