विजय कदम (लोकहित न्यूज संपादक )
नेर दौऱ्यात त्यांनी विविध शासकीय विभागांच्या कामकाजाचा सविस्तर आढावा घेतला. त्यांनी तहसील कार्यालय, पंचायत समिती, ग्रामीण रुग्णालय, पोलीस स्टेशन तसेच कृषी विषयक प्रकल्पांना भेटी दिल्या. या प्रसंगी तहसीलदार पुरुषोत्तम भुसारी, अप्पर तहसीलदार ओंकार एकाळे, पोलीस निरीक्षक श्री. बेहरानी, निवासी नायब तहसिलदार श्री. बकाले, नायब तहसिलदार श्री. इंगोले व श्री. पंधरे, गटविकास अधिकारी राजीव शिंदे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. जया चव्हाण, तालुका कृषी अधिकारी प्रतीक्षा नवले, उपकार्यकारी अभियंता श्री. पटेल (लघु सिंचन), सहाय्यक निबंधक श्री. भगत, गटशिक्षणाधिकारी श्री. देशपांडे, उपअधीक्षक भूमिअभिलेख श्री. गायनर, दुय्यम निबंधक श्री. इंगळे ग्रामिण रुग्णालयाचे डॉ. भोयर तसेच नगरपरिषद कार्यालयाचे अधीक्षक कपिल देवकर व विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
बैठकीत विविध शासकीय योजनांची अंमलबजावणी, प्रलंबित कामे, लोकाभिमुख उपक्रम आणि सर्वसमावेशक विकासाविषयी चर्चा करण्यात आली.
तहसील कार्यालय व सेतू सुविधा केंद्राची पाहणी
जिल्हाधिकारी श्री मीना यांनी नैसर्गिक आपत्ती कक्षास भेट देऊन शेतकरी अनुदान वाटपाची स्थिती तपासली. तसेच आयुष्मान कार्ड वितरण, घरकुल योजना व इतर विभागांच्या कामकाजाचा आढावा घेतला. त्यानंतर सेतू सुविधा केंद्रातील सेवा, नागरिकांना मिळणाऱ्या सुविधांची अंमलबजावणी व कामकाजाची पाहणीही त्यांनी केली.
पायाभूत सुविधांची पाहणी
यानंतर त्यांनी पंचायत समिती, नेर येथे भेट देऊन पायाभूत सुविधा, ग्रामविकास आणि ग्रामीण योजनांची सद्यस्थिती जाणून घेतली.
ग्रामीण रुग्णालयास भेट
नेर येथील ग्रामीण रुग्णालयास भेट देऊन त्यांनी आयुष ओपीडी, रुग्णवार्ड, उपलब्ध सुविधा यांची पाहणी केली. रुग्णांशी संवाद साधत उपचार व सेवांबद्दल समाधान जाणून घेतले.
पोलीस स्टेशनची पाहणी
दौऱ्यात त्यांनी नेर पोलीस स्टेशनला भेट देऊन स्टेशन डायरी, मुद्देमाल कक्ष तसेच गुन्हे नोंदणी प्रक्रिया याची समीक्षा केली. कृषी प्रकल्पांना भेट व रोजगारनिर्मिती व पर्यावरण संवर्धनाला चालना मौजा माणिकवाडा येथे अमोल व राहुल नाल्हे यांच्या शेतातील मोहगनी लागवड प्रकल्पाची पाहणी करताना जिल्हाधिकारी मीना यांनी प्रकल्पातून रोजगारनिर्मिती व पर्यावरण संवर्धनाला चालना मिळत असल्याचे नमूद केले.
तसेच टाकळी सलामी येथील शेतकरी देविदास जाधव यांच्या रेशीम लागवड प्रकल्पाला भेट देऊन उत्पादन क्षमता, बाजारपेठ व शेतकऱ्यांना मिळणाऱ्या सुविधा जाणून घेतल्या.











