विजय कदम (लोकहित न्यूज संपादक)
नगरपालिका निवडणुकीसाठी २६ नोव्हेंबरला चिन्हाचे वाटप झाले .२७ तारखेपासून प्रचाराचा खरा वणवा पेटला .घराघरांत भेटी ,मिरवणूका पोस्टर -बॅनर ,पत्रके अशा माध्यमांतून उमेदवारांनी प्रचार सुरु केला आहे .प्रचाराचा जल्लोष उत्कर्षबिंदूला पोहोचला असून आता 18 डिसेंबर रोजी रात्री १० वाजता प्रचार धुमधडाका संपणार आहे . आणि 20 डिसेंबर रोजी मतदान होणार आहे. कुमारी तेजस्विनी चांदेकर ह्या नशिब आजमावत* *आहेत.त्यांचे विकास कामे व जनसंपर्क चांगला आहे व त्या यवतमाळ मध्ये प्रसिद्ध असून ,त्यांची कामे चांगली आहेत . व जनतेप्रती त्यांची धडपड पाहता ,सर्वत्र कु. तेजस्वीनीताई चांदेकर यांच्या नावाची चर्चा असून ,याळेसच्या निवडणुकीत ते बाजी मारणार असा अंदाज मतदारांचा आहे.
कुमारी तेजस्विनी चांदेकर यांच्या प्रचार कामी दिग्गज नेते रस्त्यावर उतरले आहेत.पक्षाचे दिग्गज नेते फील्डवर उतरले आहेत.प्रत्येक नेत्याची नगराध्यक्षपदाचे उमेदवार तेजस्विनीताई चांदेकर व सर्व प्रभागातील नगरसेवक पदाचे उमेदवाराला विजय मिळवून देण्याची प्रतिष्ठा पणाला लागली आहे .प्रचारासाठी उमेदवारांसह पक्षांचे कार्यकर्ते जिवाचे रान करून प्रचारात उतरले आहेत.
कुमारी तेजस्विनीताई चांदेकर यांनी मतदारांना आश्वासन दिले आहे की,माझ्या संपूर्ण यवतमाळचा सर्वांगीण विकास वृद्धींगत होण्या हेतुने काम करण्याची आंतरीक तळमळ आहे .मी यवतमाळ मधील उर्वरित रस्ते ,नाल्या शैक्षणीक ,आरोग्य व इतर मुलभुत सुविधा निर्माण करुन देण्याकरीता वचनबद्ध आहे. यवतमाळ मधील आढावा घेतला असता ,याठिकाणी कुमारी तेजस्विनीताई चांदेकर हे बाजी मारणार असल्याचे बोलल्या जात आहे












