विजय कदम (लोकहित लाईव्ह न्युज संपादक )
आपापल्या क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्ती आणि संस्थांना महात्मा फुले स्मृतिदिनानिमित्त दिला जाणारा ‘सत्यशोधक भाऊसाहेब माने समाजभूषण पुरस्कार’ येत्या १० जानेवारी रोजी जिजाऊ सांस्कृतिक भवन येथे वितरित होणार आहे. भाऊसाहेब माने गौरव कृती समितीमार्फत यावर्षी आठ व्यक्ती व सामाजिक संस्थांना सन्मानित केले जाणार आहे.यावर्षी क्रीडा, पत्रकारिता, शिक्षण, दिव्यांग उद्योग, नैसर्गिक पर्यावरण संवर्धन, महिला सक्षमीकरण, रेशीम शेती आणि सामाजिक कार्य अशा विविध क्षेत्रांमध्ये योगदान देणाऱ्या सतीश मुडे, संभाजी भोयर, प्रशांत सराफ, नागेश मिरासे, रविता लकडे, सुशील मुधळे, माणुसकीची भिंत सोशल फाउंडेशन पुसद आणि नैसर्गिक पर्यावरण संवर्धन संस्था उमरखेड यांचा गौरव होणार आहे. तालुक्यात होऊन गेलेल्या महान लोकनेत्यांच्या कार्याचा आदर्श समाजापुढे राहावा, या हेतूने डॉ. विजयराव माने यांच्या संकल्पनेतून हे पुरस्कार आयोजित केले जातात. तालुक्यातील रसिक बांधवांनी कार्यक्रमास उपस्थित राहावे, असे आवाहन समितीचे अध्यक्ष प्रवीण सूर्यवंशी आणि पदाधिकाऱ्यांनी केले आहे.













