विजय कदम (लोकहित लाईव्ह न्युज संपादक )
आसान्या फाउंडेशन यवतमाळ यांच्या विद्यमाने क्रांतीज्योती सावित्री आई फुले जयंतीचा कार्यक्रम नागभुमी बुद्ध विहार वडगांव यवतमाळ या ठिकाणी उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाला प्रमुख अतिथी व कार्यक्रमाचे उद्घाटक माननीय परवीन बशीर पठाण मॅडम विभागीय वन अधिकारी यवतमाळ अध्यक्ष माननीय रेखाताई महेंद्र भवरे सहाय्यक पोलीस आयुक्त सेवानिवृत्त तर प्रमुख पाहुणे मा. ऍड अरुण मेहेत्रे निवृत्त सहायक वनसंरक्षक अध्यक्ष ज्योतिबा दिन बंधू कल्याण मंडळ यवतमाळ मा. निळकंठ भगत अध्यक्ष डॉ. बाबासाहेब आंबेडकर बहुउद्देशीय संस्था नागभुमी वडगांव मा. दिपक मनवर सचिव, डॉ. किशोर बनसोड उपस्थित होते माननीय प्रा. श्रद्धा ताई धवणे आंबेडकर तथा थेरी गाथा लेखन मा. सुनीता ताई काळे अध्यक्ष सत्यशोधक महिला विचार मंच यवतमाळ मा. संगीताताई सव्वालाखे कृषी उद्योजिका हे प्रमुख मान्यवर उपस्थित होते. प्रथम उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन व माल्यार्पण करून अभिवादन करण्यात आले. त्यानंतर पल्लवी कांबळे उज्वला कांबळे रेखा गुजर, रक्षिता कांबळे यांनी सावित्री वंदन गीत गायले. सर्व मान्यवरांचा पुष्परोप देऊन सन्मान करण्यात आला. नगरपरिषद शाळा क्रमांक 20 येथील विद्यार्थ्यांनी फुले सावित्री नसती तर मुलगी शिकली असती कां हे नृत्य सादर केले आणि सर्व श्रोत्यांची वाहवा मिळवली त्यानंतर माननीय परवीन बशीर पठाण मॅडम यांचा शाल आणि आसान्या सन्मान चिन्ह देऊन अध्यक्षांच्या आणि प्रमुख मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. सर्व मान्यवरांचा आसान्या फाउंडेशनच्या वतीने सन्मान करण्यात आला त्यानंतर प्रमुख वक्त्यांनी मार्गदर्शन केले ज्यामध्ये माननीय श्रद्धाताई धवणे, सुनिता ताई काळे, संगीता कोकणे, प्रणाली धर्माळे संगीता सव्वालाखे रेखा भवरे ऍड अरूण मेहेत्रे यांनी सावित्रीबाईंच्या कार्याचा उलगडा करत त्यांच्या थोर कार्याची ओळख करून दिली यावेळी विविध क्षेत्रात आपल्या कार्यकर्तृत्वाचा ठसा उमटवणाऱ्या महिलांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला कु. अक्षरा निलेश भारसाकळे उत्कृष्ट हॉकी खेळाडू तसेच जान्हवी देवेंद्र पाटील राष्ट्रीय हॉकी खेळाडू राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त भिमाबाई गाढवे, निवृत्त जमादार वेणूताई मोहतुरे, प्रणाली धर्माळे, नंदादीप फाउंडेशनच्या संचालिका नंदिनीताई संदीप शिंदे, पल्लवीताई कांबळे माधुरीताई फेंडर, विनिता गौतम, या सावित्रीच्या लेकींचा शाल मोमेंटो आणि पुष्परोप देऊन सन्मान करण्यात आला. आसान्या फाउंडेशन च्या वतीने हिमोग्लोबिन रक्त शिबिर आयोजित करण्यात आले होते यामध्ये महिलांनी आपली रक्ताची तपासणी केली हे शिबिर डॉ. महेंद्र पखाले आणि टेक्निशियन खंडारे यांच्या मार्गदर्शनात घेण्यात आले या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कल्पनाताई घनमोडे यांनी केले प्रास्ताविक मृणालीनी दहीकर यांनी केले तर आभार प्रदर्शन स्मिता मेश्राम यांनी केले कार्यक्रमाच्या यशस्वीते करिता निळकंठ भगत, घनमोडे साहेब, नितीन पाटील,लंबे साहेब, डॉ. किशोर बनसोड, नितेश मेश्राम, संध्याताई भगत,तेजल कांबळे ,कविता डोंगरे मंगला वनकर, यांनी सहकार्य केले. आपल्या कृतिशील समाजसेवेतून सामाजिक सुधारणेचा उत्तुंग आदर्श घालून देणाऱ्या क्रांतीज्योती सावित्री आई फुले यांना अभिवादन करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.













