विजय कदम
(लोकहित लाईव्ह न्युज संपादक )
शनिवार दिनांक 15 नोव्हेंबर 2025 रोजी पोफाळी पोलीस स्टेशनचे विद्यमान ठाणेदार पंकज दाभाडे साहेब यांची प्रशासनाच्या आदेशानुसार दिग्रस येथे नुकतीच बदली झाली व त्यांनी आपल्या पदाचा कार्यभार अधिकृतरित्या पुसद येथील वाहतूक शाखेचे कर्तव्यदक्ष वाहतूक निरीक्षक निलेश शेंबडे साहेब यांना पोफाळी येथील पोलीस स्टेशन ठाणेदार पदाचा पदभार सोपविला. त्यानंतर नवीन ठाणेदार यांचे सर्व कर्मचाऱ्याकडून पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.निलेश शेंबडे साहेब यांनी ठाणेदारपदी रुजू झाल्यानंतर त्यांनी ठाण्यातील अधिकारी व कर्मचाऱ्यांशी संवाद साधत कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी सक्रिय व संवेदनशील पद्धतीने काम करण्याचा संकल्प केला. याप्रसंगी पोलीस दलातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.







