विजय कदम (लोकहित लाईव्ह न्युज संपादक )
स्वच्छता दूत महाराष्ट्र म्हणून कार्यरत असलेले राष्ट्रसंत गुरुवारी सद्गुरु साईनाथ महाराज वसमतकर राज्यभरात स्वच्छतेचे विविध उपक्रम राबवित असून शिक्षण, महिला सबलीकरण, व्यसनमुक्ती, शेतकरी आत्मचिंतन, सामाजिक एकात्मता, अंधश्रद्धा निर्मूलन, वृक्षारोपण, अन्नछत्र, पाणी आडवा–पाणी जिरवा आदी विषयांवर कीर्तन, प्रवचन व उपक्रमांच्या माध्यमातून प्रभावी जनजागृती करीत आहेत.
याच जनजागृती उपक्रमाचा भाग म्हणून उमरखेड येथील हुतात्मा मधुकर चौधरी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत (आयटीआय) साईनाथ महाराज वसमतकर यांच्या मार्गदर्शनाखाली स्वच्छता अभियान राबविण्यात आले. कार्यक्रमात विद्यार्थ्यांना स्वच्छतेचे महत्त्व पटवून देत त्यांनी “नोकरीच्या मागे न लागता उद्योजक बना, औद्योगिक क्षेत्रात संधी अपार आहेत. सुशिक्षित बेरोजगारांना रोजगारनिर्मितीची संधी उपलब्ध करून देणे तुमच्याच हातात आहे,” असे आवाहन केले.
तसेच गुरुजनांचा व आई-वडिलांचा मान राखण्याचे महत्त्व सांगत त्यांनी “देव देऊळात नसून खरा देव आई-वडिलांत आहे. व्यसनांपासून दूर राहा आणि उज्ज्वल भविष्य घडा,” असा संदेश दिला.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला संस्थेचे प्राचार्य श्री डी.पी. पवार यांनी साईनाथ महाराजांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. प्रस्ताविक श्री गायकवाड सर यांनी केले.
या प्रसंगी महाराजांचे सहकारी श्री डोईफोडे, सोनटक्के, संजय तळणकर, मारुती ढोले, संतोष मते, नाना गोरे, फाळके, भगिनी माता आदींची उपस्थिती होती.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी श्री ए.डी. कुंभारे, निंबुळकर सर, पाटील सर, नारनवरे सर, इंगोले सर, पंकज कदम, गौरव चिंचोळे, बी.एस. नरवाडे, मयूर कुंभारे, मनीषा नरवाडे मॅडम, अश्विनी निम्बेकर मॅडम, सपना नरवाडे मॅडम, उमेश सोनुवणे सर, आदित्य भोसले सर, शेख हर्षद सर, शिरसाट सर, ढोबळे सर व गुट्टे सर यांनी पुढाकार घेऊन कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडला.







