विजय कदम (लोकहित लाईव्ह न्यूज संपादक )
काॅंग्रेस पक्ष,शिवसेना (उबाठा) पक्षासोबत उमरखेड जनशक्ती आघाडी केलेल्या सौ. तेजश्रीताई जैन यांचा प्रचार चालू पण ,निवडणूक ‘चिन्ह’ नाही?
निधीताई भुतडा यांनी अर्ज दाखल करतांना कृषि उत्पन्न बाजार समितीच्या प्रांगणात सभा घेत, ढोल ,ताशे व रॅली काढत भाजपचा नगराध्यक्ष पदाचा उमेदवारी अर्ज दाखल केला .तर काॅंग्रेस पक्ष ,शिवसेना बाळासाहेब ठाकरे पक्ष प्रणित पॅनलच्या जनशक्ती आघाडीकडून तेजश्रीताई जैन यांनी कुठंलाही गाजावाज न करता साध्या पद्धतीने नगराध्यक्ष पदाचा अर्ज दाखल केला . नगराध्यक्ष पदासाठी शिवसेना (शिंदे) पक्षाच्या सौ. शारदाताई जाधव ,राष्ट्रवादी( शप) पक्षाच्या सरोजताई देशमुख यांनी नगराध्यक्ष पदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.
छाननी पूर्ण होताच पक्षीय उमेदवारांनी पक्षाच्या अधिकृत चिन्हाचा वापर करुन मोठ्या जोमाने प्रचार सुरु केला आहे .गळ्यात पक्षाच्या चिन्हांचे दुप्पटे,हातात ध्वज आणि कार्यकर्त्यांच्या मोठ्या फौजेसह हे उमेदवार प्रभागात फिरतांना दिसत आहेत.मात्र, काॅंग्रेस पक्ष व शिवसेना (ठाकरे) प्रणित उमरखेड जनशक्ती पॅनलच्या उमेदवार तेजश्रीताई जैन यांना अधिकृत चिन्ह मिळण्यासाठी काही दिवस प्रतीक्षा करावी लागणार आहे . २६ नोव्हेंबरला चिन्ह मिळाल्यानंतर त्यांच्याकडे केवळ पाच दिवसांचा प्रचारकाळ उरेल.
भाजप पक्षातर्फे ‘कमळ’ चिन्हावर निवडणूक लढवत असलेल्या निधीताई भुतडा यांच्या प्रचाराने जोर पकडला आहे . परंतू नगराध्यक्ष पदाच्या लढतितील ‘तुल्यंबळ’ लढत देऊ शकणार्या तेजश्रीताई यांना चिन्ह न मिळाल्याने अडथळे निर्माण होतांना दिसत आहेत . राष्ट्रवादी (शप)पक्षाच्या सरोज देशमुख यांच्याकडे तुतारी वाजवणारा मानुस तर शिवसेना (शिंदे) पक्षाच्या शारदाताई जाधव यांचेकडे ‘धनुष्य बाण’ हे चिन्ह आहे .
शुक्रवार, २१ नोव्हेबर रोजी भाजप पक्षाच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार निधीताई भुतडा यांच्या प्रचारासाठी भव्य रॅलिचे आयोजन करण्यात आले होते . ही रॅली छत्रपती शिवाजी वार्ड महात्मा बसवेश्वर संस्थान,खडकेश्वर महादेव मंदिर, तातार शहा बाबा दर्गा ,विठ्ठल रुखुमाई मंदिर,चौभारा गणपती मंदिर , हनुमान मंदिर ,रामदेवबाबा मंदिर(नागचौक) , छत्रपती शिवाजी महाराज चौकातील हनुमान मंदिर व नाथनगर मधील गजानन बाबा मंदिर मध्ये नारळ फोडत नतमस्तक होऊन या रॅलिचा समारोप करण्यात आला . भाजपच्या शानदार रॅलिमध्ये भाजप जिल्हा समन्वयक नितीन भाऊ भुतडा ,आ.किसनराव वानखेडे,माजी आ. उत्तमराव इंगळे ,माजी आ.विजयराव खडसे , इरफान कुंदन ,रमेश चव्हान,चिकने भाऊ,अजय बेदरकर सर,संतोष देव,शहर अध्यक्ष अतुल खंदारे,महेश काळेश्वरकर, पुंडलीक कुबडे ,नगरसेवक पदाचे उमेदवार प्रकाश दुधेवार, सागर दिघेवार,नितीन माहेश्वरी ,अजय माहेश्वरी ,संचिन घाडगे ,वंदना घाडगे ,संतोषी हिंगमीरे, लिला हिंगमीरे,संध्या सोनाळे, सविता पाचकोरे, मनिषा काळेश्वरकर, योगिनी पांडे ,आशा देवसरकर,स्मिता आढावे, जोत्सना रुडे,डाॅ. प्रतिक रुडे, सुजाता वानखेडे, सुरेंद्र कोडगिरवार, पवन मेंढे , खुशबू मेंढे, अमोल तिवरंगकर, गजानन मोहळे ,आश्विन कन्नावार, अमोल वडघरे ,पप्पू कर्हाळे ,सुशांत भराडे,विजय गुजरे सर, डाॅ. जयशंकर जवने ,डाॅ.जवने , अरविंद भोयर ,भास्कर साधु महाराज ,किशोर तिवारी यांचे सह शेकडो महिला ,पुरुष ,तरुण युवक उपस्थित होते.







