विजय कदम (लोकहित न्यूज संपादक )
उमरखेड जनशक्ती पॅनलतर्फे १३ ही प्रभागातील निवडणूक लढवणारे सर्वंच उमेदवार जनतेशी तगडा जनसंपर्क असलेले आहेत. आज सकाळी प्रभाग क्रमांक ४ सदानंद वार्ड ,टीळक वार्ड ,लोहार गल्ली खडकपुरा परिसरात भव्य प्रभाग रॅली निघाली. नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार तेजश्रीताई संतोषजी जैन, नगरसेवक पदाचे उमेदवार गणेश शामराव खंदारे व रुपाली सुधीर कवाने यांनी मतदारांना भेटी देत, आपले अमुल्य मतदान आम्हाला दया ! म्हणत भेटी घेतल्या .यावेळी काॅंग्रेसचे जेष्ठ नेते नंदकीशोर अग्रवाल (काकाजी), तातू भाऊ देशमुख,बाळासाहेब नाईक, प्रशांत पत्तेवार ,ईश्वर दादा गोस्वामी,माजी नगराध्यक्षा अर्चनाताई बाळासाहेब नाईक यांचेसह शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.
राष्ट्रवादी काॅग्रेस पार्टी ,एमआयएम ,शिवसेना (शिंदे), भारतीय जनता पार्टी सह भारतीय राष्ट्रीय काॅंग्रेस ,शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आणि विदर्भ -मराठवाडा विकास आघाडी प्रणित उमरखेड जनशक्ती पॅनल निवडणूक मैदानात आहे . नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार तेजश्रीताई जैन यांनी व भाजपच्या निधीताई भुतडा यांनी प्रचारासाठी आघाडी घेतली आहे . यापाठोपाठ शिवसेना (शिंदे) पक्षाच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार शारदाताई संजय जाधव हे मैदानात उतरले आहेत .
उमरखेड जनशक्ती पॅनलने धनशक्तीचा गर्व मोडू …जनशक्तीचा विजय घडवू ! हा नारा दिला असून, या पॅनलचे सर्व १३ ही प्रभागातील उमेदवार अंतिम रिंगणात आहेत. तेजश्रीताई जैन उमरखेड शहरातील सर्वं जनतेच्या भेटी घेत आपले भाग्य आजमावत आहेत. नामांकीत वकील संतोषजी जैन साहेब यांच्या सौभाग्यवती तेजश्रीताई जैन ह्या स्वतः नगराध्यक्ष पदासाठी निवडणूक मैदानात असल्याने त्यांची चर्चा सर्वत्र घराघरात पोहोचली आहे . भाजपतर्फें निधीताई नितीनजी भुतडा नगराध्यक्ष पदासाठी उभे असून ही निवडणूक इतिहासातील मोठी निवडणूक असणार आहे . नगराध्यक्षा कोण ? होणार तेजश्रीताई जैन की निधीताई भुतडा हीच चर्चा गल्ली बोळीत ,चौकाचौकात असून दोन्ही उमेदवार वजदार आहेत.







