-जिल्हाधिकारी विकास मीना यांचे स्पष्ट निर्देश
बाल विवाह जिल्हा कृती दलाची बैठक बालविवाह वेळीच रोखण्यासाठी सर्वंकष प्रयत्न करा जिल्ह्यात एकही बालविवाह होता कामा नये
-जिल्हाधिकारी विकास मीना यांचे स्पष्ट निर्देश
विजय कदम (लोकहित लाईव्ह न्युज संपादक )
बालविवाह प्रतिबंधक कायद्याची प्रभावी अंमलबजावणी व्हावी. जिल्ह्यात एकही बालविवाह होता कामा नये यासाठी सर्वंकष प्रयत्न करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी विकास मीना यांनी येथे दिले.
जिल्ह्यात बाल विवाह प्रतिबंधक कायद्याच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी बाल विवाह कृती दल गठित करण्याबाबतची महत्त्वपूर्ण बैठक नुकतीच झाली, त्यावेळी ते बोलत होते.
या बैठकीत बाल विवाह प्रतिबंधक कायद्याविषयी जागृती वाढविणे, बाल विवाह प्रकरणे बाबत चाईल्ड हेल्प लाईन वर आल्यास त्वरित कार्यवाही करणे, गाव पातळीवरील शाळाबाह्य विद्यार्थी, संकलन प्रणाली मजबूत करणे, शाळाबाह्य व अल्पवयीन मुलींचे अनुसरण (ट्रॅकिंग), शाळा पातळीवर, ग्राम पंचायत पातळीवर चाईल्ड हेल्प लाईन १०९८ क्रमांक दर्शनी भागात लावणे, लग्न प्रसंगी सेवा देणाऱ्या सेवा पुरवठादार यांच्या सोबत समन्वय साधून संशयित बाल विवाह प्रकरणांमध्ये त्वरित हस्तक्षेप करण्याबाबत महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले.
कृती दलाच्या माध्यमातून जिल्ह्यातील सर्व विभागांचे समन्वयित कार्य वाढविणे, बाल विवाह रोखण्यासाठी जनजागृती मोहीम राबविण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला. शाळा व महाविद्यालय पातळीवर बाल विवाह या विषयी मार्गदर्शन सत्र आयोजित करणे, युवकांचा यामध्ये सहभाग वाढवणे, यामध्ये ग्रामपंचायत, अंगणवाडी, आशा वर्कर, शाळा व्यवस्थापन समित्या आणि स्थानिक स्वयंसेवी संस्थांचा सक्रिय सहभाग राहणार आहे. अश्या कार्यक्रमाची आखणी करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी यांनी महिला व बाल विकास विभाग यांना दिल्या.
यावेळी विशाल जाधव- जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी व देवेंद्र राजूरकर- जिल्हा बाल संरक्षण अधिकारी यांनी बाल विवाह कायद्याच्या तरतुदी, जिल्हा बाल संरक्षण कक्ष ने केलेली कार्यवाही, बाल विवाह बाबत सर्व विभाग यांनी पार पाडायची भूमिका व अनुसरायाची पद्धती याबाबत सादरीकरण केले.
या बैठकीत संतोष धोत्रे – अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी, हेमंत कट्यारमाल- जिल्हा क्रीडा अधिकारी, युवराज मेहत्रे- उपमुख्य कार्यकारी अधिकारी पंचायत विभाग, प्रशांत विधाते- बाल विकास प्रकल्प अधिकारी (नागरी), वंदना नाईक- उपशिक्षणाधिकारी, राज्य मडावी- विस्तार अधिकारी शिक्षण विभाग, दिपमाला भेंडे- पोलीस निरीक्षक पोलीस अधीक्षक कार्यालय, एम सी रामटेके व अनिकेत इंगोले आरोग्य विभाग, स्वप्नील कुलकर्णी- जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, र.श.जतकर कामगार विभाग, स्नेहा राऊत- आदिवासी विकास विभाग, सुशील उचले सहा. आयुक्त, जिल्हा कौशल्य विकास विभाग, अनिल गायकवाड- सदस्य बाल कल्याण समिती, शशिकांत राठोड जिल्हा समन्वयक NSS, अनिल ढेंगे युवा भारत केंद्र, फाल्गुल पालकर चाइल्ड हेल्प लाईन, माधुरी पावडे संरक्षण अधिकारी, जिल्हा बाल संरक्षण कक्षचे स्वप्नील शेट्ये, सुनील बोक्से व शुभम कोंडलवार तसेच विविध स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते. बैठकीच्या शेवटी सर्व विभागांनी परस्पर सहकार्याने जिल्हा ‘बाल विवाहमुक्त’ करण्याचा संकल्प व्यक्त केला तसेच बाल विवाह प्रतिबंध प्रतिज्ञा घेतली व आंतरराष्ट्रीय दत्तक माह निमित्य पोस्टरचे प्रकाशन करण्यात आले.







