विजय कदम (लोकहित लाईव्ह न्युज संपादक )
शनिवार दिनांक 20 डिसेंबर 2025 रोजी उमरखेड तालुक्यातील वसंत प्रायव्हेट कारखाना पोफाळी या ठिकाणी पोफाळी पोलीस स्टेशनचे ठाणेदार निलेश शेंबडे साहेब व उमरखेडचे वाहतूक शाखा निरीक्षक अमोल गुंडे साहेब यांनी भेट देऊन, ऊस वाहतूक करणारे ट्रॅक्टर चालक,ट्रक चालक, व सर्व वाहन मालक यांची मीटिंग घेऊन ऊस वाहतूक करताना वाहतूक नियमांची अंमलबजावणी करणे बाबत सूचना दिल्या आहेत. यावेळी अनेक सूचना देऊन अंमलबजावणी नाही झाल्यास कडक कारवाई करण्यात येणार असा इशारा यावेळी देण्यात आला.
1) प्रत्येक वाहनावर मागील बाजूस इंडिकेटर रिफ्लेक्टर बसविणे,
2) वाहन चालविताना गाणे वाजू नये,
3) वाहन रस्त्यावरून नेताना वेगावर नियंत्रण ठेवावे,
4) वाहन चालविताना मद्यपान करून वाहन चालविल्यास कडक कारवाई करण्यात येईल. 5) अरुंद रस्त्यावर किंवा वळणावर इतर वाहनांना ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न करू नये
,6) रिफ्लेक्टर आणि दिवे ट्रॉलीच्या मागे रेड रिफ्लेक्टर किंवा रेडियम असणे अनिवार्य आहे रात्रीच्या वेळी हेड लाइट्स आणि टेललाईट चालू ठेवावेत.
7) मर्यादित वजन उसाची भरणी वाहनाच्या क्षमतेपेक्षा जास्त भरू नये व बाहेर ऊस लोमकाळणार नाही नाही याची काळजी घ्यावी,
8)ऊस व्यवस्थित दोरीने किंवा साखळीने बांधलेला असावा, जेणेकरून रस्त्यात ऊस पडणार नाही याची काळजी घ्यावी.
9) डबल ट्रॉली जोडलेली असल्यास वळण घेताना अत्यंत काळजी घ्यावी आणि वेगावर नियंत्रण ठेवावे.
10) ट्रॅक्टर फक्त नेमून दिलेल्या पार्किंग झोनमध्येच उभा करावा. रस्त्यात ट्रॅक्टर उभा करून वाहतुकीला अडथळा निर्माण करू नये.
11)कागदपत्रे: चालकाकडे परवाना (License) आणि ट्रॅक्टर-ट्रॉलीची कागदपत्रे सोबत असणे आवश्यक आहे.
12)प्रवासाला निघण्यापूर्वी ब्रेक आणि टायरची स्थिती तपासून घ्यावी.
13)ट्रॉली मागे घेताना किंवा वळवताना क्लिनरची मदत नक्की घ्यावी.
14) ड्रायव्हिंग करताना मोबाईलवर बोलणे टाळावे अन्यथा कारवाई करण्यात येईल.
यावेळी अश्या अनेक महत्त्वाच्या सूचना देण्यात आल्या.













