विजय कदम (लोकहित लाईव्ह न्यूज संपादक )
पुसद नगरपरिषदेच्या निवडणुकीमध्ये मतदारांनी कोणत्याच पक्षाला स्पष्ट बहुमत दिले नसले तरी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाने मात्र सर्वात जास्त १४ जागा बळकावीत आपले वर्चस्व सिद्ध केले. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसने ६ जागा आपल्या ताब्यात ठेवण्यात यश मिळवले. तर कमळाचे पाणीपत होत त्यांना फक्त ५ जागेवर समाधान मानावे लागत आहे. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाच्या वतीने ३ उमेदवारांनी विजयश्री खेचून आणली तर पुसद नगर परिषदेमध्ये ३ अपक्ष उमेदवारांनाही मतदारांनी प्रतिनिधित्व करण्याची संधी दिली.पुसद नगरपरिषदेच्या अध्यक्ष पदाकरिता अटीतटीच्या झालेल्या निवडणुकीमध्ये राज्यमंत्री इंद्राणील नाईक यांच्या धर्मपत्नी मोहिनी नाईक यांचा निसटता विजय झाला.
पुसद नगरपरिषदेची अध्यक्षपदाची निवडणूक ही राज्यामध्ये प्रतिष्ठेची निवडणूक म्हणून गणल्या जात होती. या निवडणुकीमध्ये विशिष्ट एका समाजाची गट्टा मते विशिष्ट उमेदवारालाच मिळणार अशा वावड्या उडत होत्या.
पुसद नगरपरिषदेच्या अध्यक्षपदाच्या झालेल्या अटीतटीच्या निवडीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या मोहिनी नाईक यांनी आपले प्रतिस्पर्धी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे डॉ. मोहम्मद नदीम यांचा ६४५ एवढ्या मतांनी पराभव करीत अध्यक्ष पदाच्या खुर्चीवर विराजमान होण्याचा मान मिळविला.
मिळण्यास सुरुवात झाली होती. मतमोजणीला सुरुवात झाल्यानंतर पहिल्या फेरीपासूनच राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार मोहिनी नाईक यांनी अल्प अल्प मताची
आघाडी घेत आपल्या विजयाकडे वाटचाल सुरू ठेवली होती.













