विजय कदम (लोकहित लाईव्ह न्युज संपादक )
उमरखेड येथील हुतात्मा मधुकर चौधरी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था,येथे गुरुवार दिनांक २६ डिसेंबर २०२५ रोजी ‘वीर बाल दिवस’ अत्यंत उत्साहात व भावपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. शिखांचे दहावे गुरू, श्री गुरु गोविंद सिंगजी यांचे सुपुत्र साहिबजादा जोरावर सिंग आणि साहिबजादा फतेह सिंग यांच्या सर्वोच्च बलिदानाचा इतिहास युवा पिढीपर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
कार्यक्रमाची सुरुवात संस्थेचे आदरणीय प्राचार्य श्री डी. पी. पवार व प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते दीपप्रज्वलन व प्रतिमापूजनाने करण्यात आली. यावेळी उपस्थित सर्वांनी साहिबजाद्यांच्या शौर्याला मानवंदना अर्पण केली.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून बोलताना प्राचार्य श्री डी. पी. पवार यांनी सांगितले की,
“अन्यायासमोर झुकण्यापेक्षा मृत्यूला कवटाळणाऱ्या साहिबजाद्यांचे शौर्य जगाच्या इतिहासात अजोड आहे. त्यांच्या स्वाभिमान व धैर्याचा वारसा आजच्या तरुणांनी जतन करणे हीच त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल.”
यानंतर व्यासपीठावरील सन्माननीय उपस्थित श्री शिवानंद निंबोळकर सर यांनी प्रशिक्षणार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की,
“ज्या देशाचा इतिहास अशा वीर बालकांच्या रक्ताने लिहिला गेला आहे, त्या देशाचे नागरिक असल्याचा आपल्याला अभिमान वाटला पाहिजे. चला, त्यांच्या बलिदानातून प्रेरणा घेऊन देशाच्या प्रगतीसाठी कटिबद्ध होऊया.”
याप्रसंगी प्रशिक्षणार्थ्यांनी साहिबजाद्यांच्या शौर्यावर आधारित ओजस्वी भाषणे सादर केली. तसेच संस्थेमधील ‘वीर बालक’ म्हणून
कु. मयुरी शिंदे (इलेक्ट्रिशियन ट्रेड),कु. ऋतुजा कदम,
कु. सपना घुगरे (ब्युटी पार्लर व्यवसाय),
या बालविराणा
प्रशस्तीपत्र व पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले.या
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री बी. एस. नरवाडे यांनी केले, तर आभार प्रदर्शन संस्थेचे शिल्पनिदेशक श्री किरण पाटील यांनी मानले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी श्री के. डी. कुंभारे सर, के. एस. शिंदे सर, चिंचाळे सर, विजय थोंबले सर, श्री एस. बी. गुट्टे सर, श्री एस. बी. इंगोले सर, मनीषा नरवाडे मॅम, आश्विनी निमेकर मॅम, दिलीप धुळे व गोदाजी पोपुलवाड यांनी मोलाचे सहकार्य केले.













