विजय कदम (लोकहित लाईव्ह न्यूज संपादक)
उमरखेड तालुक्यातील जेवली येथे दिनांक २६ डिसेंबर रोजी भिल्ल नाईकडा आदिवासी समाजाच्या आगामी कुटवा महोत्सवाच्या आयोजनासंदर्भात नुकतीच एक महत्त्वाची बैठक उत्साहात संपन्न झाली. या बैठकीत महोत्सवाचे स्वरूप, नियोजन, जबाबदाऱ्या तसेच समाज एकत्रीकरणावर सविस्तर चर्चा करण्यात आली.
बैठकीचे अध्यक्ष श्री गंगाराम गडमवाड तर प्रमुख मार्गदर्शक श्री नारायणराव पिलवंड,श्री खंडेराव पिटलेवाड तसेच समाजातील ज्येष्ठ, पदाधिकारी, युवक व महिला प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कुटवा महोत्सव हा समाजाची सांस्कृतिक ओळख, परंपरा आणि एकोप्याचे प्रतीक असून तो यशस्वी करण्यासाठी सर्व समाज बांधवांचे सहकार्य अत्यावश्यक असल्याचे मत उपस्थितांनी व्यक्त केले.
महोत्सवाच्या तयारीसाठी विविध समित्या स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला असून कार्यक्रमाचे आयोजन भव्य व शिस्तबद्ध पद्धतीने करण्यावर भर देण्यात आला. समाजातील युवकांनी पुढाकार घेऊन जबाबदाऱ्या स्वीकाराव्यात, तसेच महिलांचा सक्रिय सहभाग वाढवावा, असे आवाहन करण्यात आले.
बैठकीच्या शेवटी जास्तीत जास्त समाज बांधवांनी उपस्थित राहून कुटवा महोत्सवाच्या यशस्वी आयोजनासाठी सहकार्य करावे, असे आवाहन मारोती पिलवंड व आयोजकाच्यावतीने करण्यात आले.













