विजय कदम (लोकहित लाईव्ह न्युज संपादक)
श्री शिवाजी शिक्षण संस्था, पुसद द्वारा संचालित आणि डॉ. पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठ, अकोला संलग्नीत कृषि महाविद्यालय, उमरखेडच्या वतीने मौजे पोफाळी (ता. उमरखेड) येथे राष्ट्रीय सेवा योजना विशेष निवासी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. दि. ३० डिसेंबर २०२५ ते ०५ जानेवारी २०२६ या कालावधीत चालणाऱ्या या शिबिराचे उद्घाटन मंगळवारी मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाले.शिबिराचे उद्घाटन विद्यापीठ कार्यक्रम समन्वयक (रासेयो) सौ. मंजुषा देशमुख यांच्या हस्ते पार पडले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य श्री. एस. के. चिंतले होते. प्रमुख पाहुणे, मा. श्री. सुरेश शिंदे, पोलीस उपनिरीक्षक पोफाळी यांची विशेष उपस्थिती लाभली, सरपंच मा. सौ. रेखाताई स. क्षीरसागर, उपसरपंच मा. सौ. मनिषा स. पायघन यांची उपस्थिती होती.याप्रसंगी व्यासपीठावर पोलीस पाटील श्री. माधवराव गुंढारे, श्री. संतोष क्षीरसागर, जि.प. शिक्षक श्री. अरुण ठाकरे, सेवानिवृत्त अभियंता श्री. राजूभाऊ क्षीरसागर, श्री. प्रसाद नारायणराव पतंगराव तसेच महाविद्यालयाचे डॉ. एस. बी. पवार, डॉ. एस. बी. सोळंके, श्री. वाय. एस. वाकोडे कु. संगीता शिंदे आणि श्री ए.के. गाडेकर उपस्थित होते.प्रास्ताविकात डॉ. एस. बी. पवार यांनी शिबिराच्या नियोजित उपक्रमांची माहिती दिली. या ७ दिवसांच्या कालावधीत रासेयो कार्यक्रम अधिकारी श्री. व्ही. बी. शिंदे यांच्या मार्गदर्शनात ४० स्वयंसेवकच्यावतीने ग्रामस्वच्छता, रक्तदान व रक्तक्षय तपासणी, महिला सक्षमीकरण, पटबंधारे बांधणे, शोषखड्ड्यांचे महत्त्व, मतदान जनजागृती अभियान, अंधश्रद्धा निर्मूलन, नशामुक्ती कार्यशाळा, सेंद्रिय शेती, आणि जलसंधारण यांसारख्या विषयांवर काम करणार आहेत. तसेच कृषी प्रदर्शनी व सांस्कृतिक कार्यक्रमांचेही आयोजन करण्यात आले आहे.उद्घाटक सौ. मंजुषा देशमुख यांनी तरुण पिढीमध्ये राष्ट्रसेवेची भावना निर्माण होण्यासाठी अशा शिबिरांचे महत्त्व अधोरेखित केले. युवाशक्तीचा उपयोग राष्ट्राच्या रचनात्मक कामासाठी व्हावा, असे आवाहन त्यांनी केले. प्राचार्य चिंतले यांनी शिबिराच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्व विकासावर प्रकाश टाकला.या कार्यक्रमाला पोफाळी येथील ग्रामस्थ, महाविद्यालयातील प्राध्यापक, कर्मचारी आणि राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते. शिबिराच्या यशस्वीतेसाठी रासेयो चमू परिश्रम घेत आहे.













