विजय कदम लोकहित लाईव्ह न्युज संपादक
उमरखेड महागाव विधानसभेतील शेतकऱ्यांनी महायुती सरकारने कार्यान्वित केलेल्या शासनाच्या विविधांगी अत्याधुनिक कृषिविषयक योजनेचा लाभ हक्काने घेतला पाहिजे, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती सन्मान योजना, 7.5 एचपी पर्येंतच्या कृषिपम्प धारकांचे तब्बल आट्ठे चालीस हजार (48000) कोटी रुपयांचे थकीत वीजबिल मुख्यमंत्री देवाभाऊंनी माफ करून राज्यातील शेतकऱ्यांना मोठी संजीवनी देऊन महायुती सरकार हे बळीराजाच्या हिताचे सरकार असल्याचे पुन्हा एकदा अधोरेखित केले असल्याचे कृतीदायक विधान यवतमाळ, पुसद जिल्हा समन्वयक नितीन भूतडा यांनी यावेळी केले आहे. ते भारतीय जनता पार्टी महिला आघाडी उमरखेड शहर यांच्या वतीने मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या 57 व्या वाढदिवसानिमित्त आयोजित शेतकरी महिला सन्मान सोहळ्यात महिला शेतकऱ्यांना संबोधित करीत होते.
तर आमदार किसनराव वानखेडे यांनी कृषिप्रधान देशाच्या जडन घडनिमध्ये महाराष्ट्राचा सिंहाचा वाटा असल्याचे सांगत पुरुषप्रधान संस्कृतीचा कायापालट करीत काही माता भगिनींनी स्वतः शेती करण्याचे धाडस दाखवीत इतिहासाकडे वाटचाल सुरू केली आहे, अनेक ठिकाणी महिला उत्कृष्ट शेती करीत असल्याचे सांगत त्यांनी महागावं तालुक्यातील सवना येथील कृषी विषयक पुरस्कार प्राप्त विक्रमी गुलाब पुष्पाचे उत्पादन घेणाऱ्या लक्ष्मीबाई पारवेकरांचे उदाहरण दिले. इतरही मान्यवरांनी आधुनिक शेती बाबत मार्गदर्शन केले.
सदर ” शेतकरी महिला सन्मान सोहळ्याचे ” आयोजन उत्साहपूर्ण वातावरणात स्थानिक राजस्थानी भवन येथे दि. 23 जुलै रोजी दुपारी 1 वा. करण्यात आले होते. यावेळी विविध गावांतील शंभर शेतकरी महिलांचा सन्मान करून त्यांना शेती उपयोगी किट प्रदान करण्यात आल्या.
देवाभाऊ कृषी माऊली सन्मान सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी भारतीय जनता पार्टीच्या पुसद जिल्हाध्यक्षा डॉ. आरती फुपाटे या आरुढ होत्या. तर यवतमाळ, पुसद जिल्हा समन्वयक नितीन भुतडा, उमरखेड-महागाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार कीसनराव वानखेडे, प्रदेश कार्यकारिणी सचिव तथा जिल्हा संयोजिका सौ. माया शेरे, माजी आमदार विजयराव खडसे, अत्याधुनिक व प्राचीन कृषी विषयक मार्गदर्शक अशोकराव वानखेडे सुकळीकर, सौ. निधी भुतडा, भाजपा महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा प्रा. जयश्री राठोड, पुसद नगर परिषदेच्या महिला बाल कल्याण सभापती सौ. अश्विनी जिल्हेवार आदी मान्यवर प्रामुख्याने व्यासपीठावर विराजमान होते.
अशोकराव वानखेडे सुकळीकर यांनी आपल्या मार्गदर्शनात महिला शेतकऱ्यांनी आधुनिक शेती तंत्रज्ञानाचा अवलंब करून शासनाच्या विविध योजनांचा लाभ घ्यावा, तसेच स्वावलंबनाच्या दिशेने वाटचाल करावी असे आवाहन केले.
कृषी सोहळ्याचे सूत्रसंचलन, प्रस्ताविक व मान्यवर परिचय भाजपा महिला आघाडीच्या शहराध्यक्षा डॉ. शीतल सिद्धार्थ धोंगडे यांनी तर आभारप्रदर्शन सौं. उषा तास्के यांनी केले.
देवाभाऊ कृषी माऊली सोहळ्याचे आयोजन भारतीय जनता पार्टी महिला आघाडी प्रदेश अध्यक्षा चित्रा वाघ यांचे मार्गदर्शनात उमरखेड शहर महिला आघाडी यांच्या वतीने करण्यात आले होते.
यावेळी मोठ्या संख्येने शेतकरी महिला, भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी, महिला आघाडीच्या कार्यकर्त्या व ग्रामस्थ प्रामुख्याने उपस्थित होते.
सोहळ्यात तालुकाध्यक्षा सौ. आशा देवसरकर, नगरसेविका सौ. करुणा कुबडे, ज्योत्स्ना रुडे व सौ. खुशबू पवन मेंढे तसेच शितल शेटे, सपना रासेकर, पूनम आत्राम, उज्वला पळसकर, सुवर्णा वानखेडे, विजया नरवाडे, निर्मला सोयाम, छाया खंदारे, प्रिती गवरशेट्टेवार आदींची उपस्थिती होती.











