विजय कदम लोकहित लाईव्ह न्युज संपादक
यवतमाळ जिल्हयात कोणत्याही प्रकारचे अवैध धंदे, अवैध शस्त्र, अवैध उत्खन्न सुरु राहणार नाही तसेच अउघड गुन्हे, आरोपी शोध, अवैध धंदयाचे समुळ उच्चाटन व्हावे याकरीता मा. पोलीस अधीक्षक कुमार चिंता सा यांनी पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ यांना आदेशीत केले होते. त्याच अनुषंगाने पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ यांनी त्याचे अधिस्थान पथकांना गोपनिय माहीती काढून प्रभावी छापा कारवाई करणे बाबत सुचना दिल्या आहेत.
दिनांक 24/07/2026 रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पथक उमरखेड उपविभागात अउघड गुन्हे, पाहीजे व फरार आरोपी शोध, कामी रवाना झाले. पोलीस स्टेशन उमरखेड हददीत पेट्रोलींग करीत असतांना गोपनिय बातमीदारा कडून माहीती मिळाली कि, मौजे ताजपूरा उमरखेड येथील मोहम्मद नजीर अब्दूल रहेमान कुरेशी हा त्याचे घरी शासनाने प्रतिबंधीत केलेले गोवंश मास विक्री करीत असल्याबाबत माहीती मिळाल्याने नमूद पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार असे दोन पंचासह मिळालेल्या माहीती प्रमाणे मौजे ताजपूरा उमरखेड येथील मोहम्मद नजीर अब्दूल रहेमान कुरेशी हा प्लॅस्टीक पोत्यामध्ये मास बाळगल्या स्थिती मध्ये मिळून आल्याने त्याचे ताब्यातून एकूण 244 किलो 93 ग्रॅम वजनाचे गोमांस तसेच वजन काटा, सत्तूर, लाकडी कुंदा, एकूण किंमत 75,079/- रुपये गोमांस व इतर साहीत्य जप्त करुन इसम नामे-मोहम्मद नजीर अब्दूल रहेमान कुरेशी वय 45 वर्ष, रा. ताजपूरा उमरखेड ता उमरखेड जि यवतमाळ यांचे विरुध्द पोलीस स्टेशन उमरखेड येथे महाराष्ट्र प्राणीरक्षण सुधारणा अधिनियम सन 1995 कायदा कलम 5 (क), 5(ब), 9, 9 (अ) अन्वये गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे.
सदरची कारवाई मा.पोलीस अधीक्षक यवतमाळ श्री. कुमार चिंता (भा.पो.से) सा, मा.अपर पोलीस अधीक्षक यवतमाळ श्री. अशोक थोरात (म.पो.से) सा तसेच मा. पोलीस निरीक्षक श्री. सतीश चवरे स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ, यांचे मार्गदर्शनात पोउपनि/अमोल राठोड, सफौ/संतोष भोरगे, पोहवा/सुभाष जाधव, पोहवा/कुणाल मुंडोकार, पोहवा रमेश राठोड, सर्व नेम-स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ यांनी यशस्वीरित्या पार पाडली आहे.











