विजय कदम लोकहित लाईव्ह न्युज संपादक
पोलीस स्टेशन बिटरगाव हद्दीतील ढाणकी येथे भंगार दुकानदारांवर विशेष तपासणी (Check Drive) राबविण्यात आली. सदर कारवाईदरम्यान ढाणकी येथील चार भंगार दुकानदारांच्या दुकानांची तपासणी करण्यात आली.
तपासणीमध्ये संशयास्पद स्वरूपाचा पुढीलप्रमाणे मुद्देमाल ताब्यात घेण्यात आला.4 मोटारसायकलचे मोसे (Engine)- वायरचे बंडल,2 बॅटऱ्या तसेच गावातील इतर ठिकाणांहून आणखी 8 संशयित मोटारसायकलचे मोसे ताब्यात घेण्यात आले आहेत. याशिवाय एकूण 12 संशयित मोटारसायकली पोलीस स्टेशन बिटरगाव येथे पुढील चौकशीसाठी आणण्यात आल्या आहेत.
सदर मुद्देमाल व वाहनांच्या मालकीबाबत तसेच ते चोरीचे अथवा इतर कोणत्याही गुन्ह्यातील असल्याबाबत सखोल पडताळणी सुरू असून, संबंधित व्यक्तींकडून आवश्यक कागदपत्रांची तपासणी केली जात आहे. तपासादरम्यान कोणताही गुन्हा निष्पन्न झाल्यास संबंधितांविरुद्ध कायद्यानुसार कठोर कारवाई करण्यात येईल.पोलीस स्टेशन बिटरगावमार्फत अवैध भंगार व्यवसाय, चोरीच्या वाहनांचे सुटे भाग खरेदी-विक्री तसेच मालमत्तेविरुद्धच्या गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी अशा प्रकारच्या विशेष तपासणी मोहिमा यापुढेही नियमितपणे राबविण्यात येणार आहेत.
सदर कार्यवाही पोस्टे बिटरगाव ठाणेदार पांडुरंग शिंदे यांचे मार्गदर्शनाखाली PSI सागर अन्नमवार, पोहवा मोहन चाटे, रोशन सरनाईक, राजू बेलेयवार, सुदर्शन जाधवं, शिवाजी शिंदे, गजानन मस्के, सतीश परतके, इम्रान शेख प्रकाश केंद्रे यांनी केली आहे.











