विजय कदम लोकहित लाईव्ह न्युज संपादक
रविवार दि. 26 जुलै 2026 : हुतात्मा मधुकर चौधरी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, उमरखेड येथे कारगिल विजय दिवस देशभक्तिपूर्ण वातावरणात उत्साहात साजरा करण्यात आला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे प्रभारी गटनिदेशक श्री. के. एम. पाटील हे होते. कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते श्री. बी. एस. नरवाडे यांनी प्रशिक्षणार्थ्यांना कारगिल युद्धाचा इतिहास, भारतीय सैन्याचे अद्वितीय शौर्य, बलिदान, राष्ट्रप्रेम तसेच देशसेवा, शिस्त आणि कर्तव्यनिष्ठेचे महत्त्व याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले.
यावेळी बोलताना त्यांनी सांगितले की, “भारतीय सैनिक राष्ट्राच्या सीमांचे रक्षण करतात, तर कुशल तंत्रज्ञ राष्ट्राच्या विकासाचा मजबूत पाया घालतात. त्यामुळे प्रत्येक प्रशिक्षणार्थ्याने प्रामाणिकपणा, शिस्त, वेळेचे महत्त्व, उत्कृष्ट कौशल्य आणि राष्ट्रप्रेम ही मूल्ये आपल्या जीवनात जोपासली पाहिजेत. शहीद कधीच मरत नाहीत; ते प्रत्येक भारतीयाच्या हृदयात सदैव जिवंत राहतात.” यानंतर उपस्थितांनी दोन मिनिटे मौन पाळून कारगिल युद्धातील अमर शहीदांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली.
कार्यक्रमास श्री. एस. पी. निंबोळकर, श्री. निखिल परोपटे, श्री. एस. बी. इंगोले, श्री. ए. टी. गवई, श्री. विजय थोंबले, सौ. सपना नरवाडे, सौ. मनीषा नरवाडे, श्री. ऋषिकेश भागवत, श्री. वाय. वाय. गायकवाड, श्री. पी. पी. कदम, श्री. आशिष नारनवरे, श्री. आदित्य भोसले, श्री. पंकज शिरसाट तसेच श्री. दीपक कांबळे यांच्यासह संस्थेतील अधिकारी, कर्मचारी आणि मोठ्या संख्येने प्रशिक्षणार्थी उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थितांनी कारगिल युद्धातील वीर जवानांच्या शौर्य, त्याग आणि राष्ट्रनिष्ठेचे स्मरण करून त्यांच्या आदर्शांचे पालन करण्याचा संकल्प केला. संपूर्ण कार्यक्रम देशभक्तीच्या वातावरणात उत्साहपूर्णरीत्या संपन्न झाला.











