पुसद शहर पोलीस स्टेशन हददीतील जबरी चोरी मधील अज्ञात आरोपी निष्पन्न करुन जबरी चोरीच्या गुन्हयातील 100% मुददेमाल जप्त.स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ यांची कारवाई.
लोकहित लाईव्ह न्युज संपादक विजय कदम
सोमवार दिनांक 27/07/2025 रोजी पोलीस स्टेशन पुसद शहर हददीत स्मार्ट बाजार परिसरात फिर्यादी आझाद लतीफ सैय्यद वय 65 वर्ष, रा.जामबाजार ता. पुसद जि. यवतमाळ हा महाराष्ट्र बँक मधून पैसे काढून रोडने जात असतांना एका अनोळखी इसमांने त्यास अडवून त्याचे सोबत झटापटी करुन त्याचे खिशात हात टाकून जबरीने खिशातील रोख रक्कम 14,500/- रु खेचून जबरी चोरी करुन पळून गेला म्हणून पोलीस स्टेशन पुसद शहर येथे अप क्रमांक 678/2026 कलम 309 (4) भान्यास दिनांक 27/07/2026 रोजी गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. सदर गुन्हयातील अज्ञात आरोपी निष्पन्न करुन गुन्हा उघडकीस आणन्याकामी मा. पोलीस अधीक्षक साहेब तसेच मा. पोलीस निरीक्षक सा स्थागुशा यवतमाळ यांनी सुचना दिल्या होत्या.
त्याप्रमाणे स्थागुशा यवतमाळ कॅम्प पुसद कडील तात्काळ गुन्हयाचे ठिकाणी भेट देवून फिर्यादी यांच्या सोबत चर्चा करुन अनोळखी इसमांबाबत माहीती संकलीत करुन अज्ञात आरोपीचा पुसद परिसरात शोध घेत असतांना नमूद पथकांस सदर गुन्हयातील अज्ञात आरोपी बाबत गोपनिय माहीती मिळाली कि, एक लाल रंगाची प्लसर मोटार सायकलस्वार यांनी सदरचा गुन्हा केला असून तो पुसद बस स्थानक परिसरात दिसला आहे अशी माहीती मिळाल्याने नमूद पथक तात्काळ बस स्थानक पुसद परिसरात सापळा लावला असता नमूद वर्णनांचे लाल रंगाची प्लसर मोटार सायकल घेवून एक संशयीत इसम दिसून आल्याने नमूद पथकांने अतिशय शिताफिने पोलीस कौशल्याचा वापर करुन सापळा लावून लाल रंगाच्या प्लसर मोटार सायकलस्वार आनंद विलास पवार वय 20 वर्ष, रा.आरंभी ता.दिग्रस जि. यवतमाळ यास ताब्यात घेवून गुन्हयाचे अनुषंगाने विचारपूस केली असता त्यांने सर्व प्रथम उडवा-उडवीचे उत्तरे देवू लागल्याने त्यास अधिक विश्वासात घेवून विचारपूस केली असता त्याने एका वृध्द इमसांत रोडवर अडवून इ ाटापटी करुन त्याचे खिशातील रोख रक्कम 14,500/- रु जबरीने खेचून जबरी चोरी केल्याचे कबून केल्याने पंचा समक्ष अंगझडती घेतली असता त्याचे पॅन्टच्या खिशात 500/- रु दराच्या एकूण 29 भारतीय चलनी नोटा 14,500/- रु मिळून आले अशा प्रकारे पोलीस स्टेशन पुसद शहर अप क्रमांक 678/2026 कलम 309 (4) भान्यास हा गुन्हा नमूद पथकांने अवघ्या 3 तासात उघड करुन अज्ञात आरोपी निष्पन्न करुन नमूद आरोपी आनंद विलास पवार वय 20 वर्ष, रा.आरंभी ता. दिग्रस जि.यवतमाळ यांच्याकडून गुन्हयातील रोख रक्कम 14,500/- रु, गुन्हयात वापरलेली प्लसर मोटार सायकल, मोबाईल असा एकूण 84,500/-रु मुददेमाल जप्त करुन त्यास ताब्यात घेवून जप्त मुददेमाल व आरोपी यांस पुढील कारवाई करीता पोलीस स्टेशन पुसद शहर यांच्या ताब्यात दिले.
सदरची कारवाई मा पोलीस अधीक्षक यवतमाळ श्री. कुमार चिंता (भा.पो.से) सा, मा.अपर पोलीस अधीक्षक यवतमाळ श्री. अशोक थोरात (म.पो.से) सा, मा. उपविभागीय पोलीस अधिकारी पुसद, श्री. अमर मोहीते सा, तसेच मा. पोलीस निरीक्षक श्री. सतीश चवरे स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ, मा. पोलीस निरीक्षक श्री. पुरुषोत्तम अहीरकर, पोलीस स्टेशन पुसद शहर, यांचे मार्गदर्शनात पोउपनि/अमोल राठोड, सफौ/संतोष भोरगे, पोहवा/सुभाष जाधव, पोहवा/कुणाल मुंडोकार, पोहवा/रमेश राठोड, सर्व नेम-स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ यांनी यशस्वीरित्या पार पाडली आहे.













