विजय कदम लोकहित लाईव्ह न्युज संपादक.
दिनांक 14/07/2026 रोजी उपविभाग पुसद येथे हजर करीत असतांना माहीती मिळाली कि, पोलीस पोलीस स्टेशन पुसद ग्रामीण हददीत मौजे-वरुड MIDC बिल्डींगच्या जिन्याच्या टावरवर कुजलेल्या स्थितीत इसम नामे संतोष अजबराव जाधव वय 35 वर्ष, रा. मधुकर नगर पुसद ता. पुसद जि. यवतमाळ यास कोणीतरी अज्ञात आरोपीने कोणत्यातरी अज्ञात कारणाने गळा आवळून जिवेठार मारुन पुरावा नष्ट करण्याच्या इरादयाने सदरचे प्रेत वरुड MIDC बिल्डींगच्या जिन्याच्या टावरवर टाकून दिल्याने पोलीस स्टेशन पुसद ग्रामीण अकस्मात मृत्यु रजि नंबर 28/2026 कलम 194 भारतीय नागरीक सुरक्षा संहीता वरुन पोलीस स्टेशन पुसद ग्रामीण अप क्रमांक 445/2026 कलम 103(1), 61(2), 3(5) भान्यास प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला होता.
सदर प्रेताची पाहणी करता त्यास कोणीतरी अज्ञात इसमांने कोणत्यातरी कारणाने जिवेठार मारुन पुरावा नष्ट करण्याच्या इरादयाने वरुड MIDC बिल्डींगच्या जिन्याच्या टावरवर टाकून दिल्याने आढळून आले. त्याबाबत मा. पोलीस अधीक्षक सा यवतमाळ यांनी पोलीस निरीक्षक सा स्थागुशा यवतमाळ यांना सदर गुन्हयातील अनोळखी आरोपी शोध घेवून गुन्हा उघडकीस आणन्या करीता आदेशित केले होते.
त्याप्रमाणे मा. पोलीस निरीक्षक सा स्थागुशा यवतमाळ यांनी सदर गुन्हयातील अज्ञात आरोपी शोध कामी तिन पथके तयार करुन योग्य त्या सुचना दिल्या त्याप्रमाणे स्थागुशा पथकातील अधिकारी व अंमलदार यांनी सदर गुन्हयातील मृतक यांचे मोबाईल क्रमांकाचे तांत्रीक विश्लेषन तसेच गोपनिय माहीती संकलीत केली असता सदर मृतक व गुन्हयातील एक विधीसंघर्षीत बालक यांची ओळख असल्याचे निष्पन्न झाल्याने त्यास माहीतीच्या आधारे विचारपूस केली असता. विधीसंघर्षीत बालक व त्याचा साथीदार आरोपी शाम अशोक राठोड वय 19 वर्ष, रा.अश्वीनपुर ता पुसद यांनी मृतक संतोष अजबराव जाधव वय 35 वर्ष, रा. मधुकरनगर पुसद ता. पुसद जि.यवतमाळ यास वरुड MIDC येथे मोटार सायकलसह बोलावून त्याचे मोटार सायकल विकून त्याचे पैसे मिळविण्यासाठी त्याकारणाने त्याचा शेल्यानी गळा आवळून जिवेठार मारुन पुरावा नष्ठ करण्याचे इरादयाने त्याचे प्रेत MIDC बिल्डींगच्या जिन्याच्या टावरवर टाकून दिल्याचे सांगितल्याने आरोपी शाम अशोक राठोड वय १९ वर्ष, रा. अश्वीनपुर ता पुसद जि यवतमाळ यांचा शोध घेवून त्यास सदर गुन्हयाच्या अनुषंगाने विचारपूस केली असता त्याने देखील गुन्हा केल्याचे कबूल केल्याने पोलीस स्टेशन पुसद ग्रामीण अप क्रमांक 445/2026 कलम 103(1), 61(2), 3(5) भान्यास हा अतिशय क्लिष्ट व गुंतागुतीचा गुन्हा उघड करुन आरोपी 1) शाम अशोक राठोड वय 19 वर्ष, रा. अश्वीनपुर ता. पुसद जि. यवतमाळ यास पुढील तपास कामी पोलीस स्टेशन पुसद ग्रामीण यांच्या ताब्यात दिले.
सदरची कारवाई मा. पोलीस अधीक्षक यवतमाळ श्री. कुमार चिंता (भा.पो.से) सा, मा.अपर पोलीस अधीक्षक यवतमाळ श्री. अशोक थोरात (म.पो.से) सा, मा. उपविभागीय पोलीस अधिकारी पुसद श्री. अमर मोहीते सा तसेच मा. पोलीस निरीक्षक श्री. सतीश चवरे स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ, मा. सहा पोलीस निरीक्षक, श्री. आशिष चौधरी पोलीस स्टेशन पुसद ग्रामीण यांचे मार्गदर्शनात सपोनि/धिरज बांडे, पोउपनि/अमोल राठोड, पोउपनि/शिवशंकर कायंदे, सफौ/मुन्ना आडे, सफौ/राहूल गोरे, सफौ/संतोष भोरगे, पोहवा/तेजाब रणखांब, पोहवा/सुभाष जाधव, पोहवा/कुणाल मुंडोकार, पोहवा/रमेश राठोड, पोहवा/सोहेल मिर्झा, पोहवा/मिथून जाधव, पोना/अमित झेडेकर, पोशि/महेश वाकोडे, पोशि/सुनिल पंडागळे, पोशि/पवन ढवळे, चापोउपनि/रविंद्र शिरामे, चापोहवा/विवेक पेठे चापोशि/राजेश जाधव, चापोशि/अतिम कुमरे, सर्व नेम-स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ तसेच पोउपनि/राहूल देशमुख, पोउपनि/कैलास ससाने, पोउपनि रवि चव्हाण व पथक सर्व पोलीस स्टेशन पुसद ग्रामीण तसेच सायबर सेल यवतमाळ यांनी यशस्वीरित्या पार पाडली आहे.












