हिमायतनगर तालुका प्रतिनिधी गंगाधर गायकवाड दिघीकर
हिमायतनगर तालुक्यातील मौजे दिघी येथील गुणवंत विद्यार्थी स्मित सुभाष सावते याची एमबीबीएस शिक्षणासाठी परभणी येथे वैद्यकीय महाविद्यालयात निवड झाल्याने त्यांच्यावर सर्व स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. स्मित हा शासकीय आश्रमशाळेचे सेवानिवृत्त मुख्याध्यापक सुभाषराव सावते यांचा मुलगा असुन, त्याने आपल्या जिद्द मेहनत आणि सातत्यपूर्ण अभ्यासाच्या बळावर वैद्यकीय शिक्षणाच्या क्षेत्रात उल्लेखनीय यश संपादन केले आहे. तो नवोदय विद्यालय, शंकर नगर येथील विद्यार्थी आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी शिक्षणाच्या माध्यमातून मोठे स्वप्न साकार करण्याची प्रेरणा स्मित च्या यशातुन मिळत आहे. स्मित च्या एमबीबीएस प्रवेशामुळे दिघी गावासह हिमायतगर तालुक्याच्या शैक्षणिक क्षेत्रात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यांच्या या यशाबद्दल आई वडील कुटुंबीय, शिक्षक, मित्र परिवार व तसेच गावकऱ्यांकडून त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन करण्यात आले आहे.
दिघी येथील स्मित सावते याची एमबीबीएस साठी निवड
हिमायतनगर तालुका प्रतिनिधी..गंगाधर गायकवाड दिघीकर