विजय कदम लोकहित लाईव्ह न्युज संपादक
दिनांक 29/07/2025 रोजी पोलीस स्टेशन पुसद शहर हददीत पाहीजे आरोपी शोध, अउघड गुन्हे, अवैध धंदे कारवाई कामी पेट्रोलींग करीत असतांना नमूद पथकांस मुखबीरव्दारे खात्रीशिर गोपनिय माहीती मिळाली कि, इसम नामे कैलास अरविंद चव्हाण रा. आरेगांव यांच्या ताब्यात असलेल्या वाहनांचा जिल्हा परिवहण अधिकारी यांची कोणतीही पुर्व परवानगी न घेता वाहनांचा पांढरा रंग बदलून पिवळा रंग देवून तसेच नोंदणीकृत वाहनांचा क्रमांक MH-04-GP-0773 हा दुस-या नोंदणीकृत वाहनांचा लावून सदरची स्कूल बस चालवित आहे अशी माहीती मिळाल्याने मिळालेल्या माहीतीची सत्यता पडताळण्याकरीता नमूद पथक रवाना झ गाले.
नमूद पथकांने इसम नामे-कैलास अरविंद चव्हाण यांच्या ताब्यातील पिवळया रंगाची ज्यावर वाहन क्रमांक MH-04-GP-0773 असे लिहलेल्या वाहनांचे कागदपत्राची मागणी केली असता कोणतेही कागदपत्र नसल्याचे सांगितल्याने सीट्रेस अॅप व्दारे वाहन क्रमांक MH-04-GP-0773 ची पडताळणी केली असता सदरचे मिनी बस परमेश्वर किसनराव महल्ले रा. यवतमाळ यांचे नावे असल्याचे दिसून आला वरुन परमेश्वर किसनराव महल्ले रा. यवतमाळ यास संपर्क करुन वाहन क्रमांक MH-04-GP-0773 या वाहनाचे कागदपत्र मागणी केली असता त्यानी 14/07/2025 रोजी शासनाने दिलेल्या नियमाप्रमाणे खेरदी करुन नोंदणीकृत वाहन क्रमांक MH-04-GP-0773 चे वाहन त्याचे ताब्यात असल्याचे सांगून कागदपत्र सादर केले आहे. इसम नामे कैलास अरविंद चव्हाण वय 29 वर्ष, रा.आरेगाव ता. पुसद जि. यवतमाळ यांनी त्याचे ताब्यातील गाडीचा पांढरा रंग बदलून पिवळा रंग देवून त्यावर ज्याचे नावे गाडी आहे त्याचा नोंदणीकृत क्रमांक टाकून गाडीचा अपघात झाल्यास नोंदणीकृत वाहनांच्या नंबर असलेल्या मालकास हाणी पोहचविण्याचा उददेश ठेवून दिशाभूल करुन त्याची व शासनाची फसवणुक केली असल्याने इसम नामे वय 29 वर्ष, रा. आरेगाव ता. पुसद जि. यवतमाळ यांच्या ताब्यातील पिवळा रंगाची स्कूल बस किंमत 8,00,000/- रु मुददेमाल जप्त करुन त्याचे विरुध्द पोलीस स्टेशन पुसद शहर अप क्रमांक (689/2026 कलम 318 (4) भान्यास अन्वये गुन्हा दाखल केला आहे.
सदरची कारवाई मा पोलीस अधीक्षक यवतमाळ श्री. कुमार चिंता (भा.पो.से) सा, मा.अपर पोलीस अधीक्षक यवतमाळ श्री. अशोक थोरात (म.पो.से) सा, मा. उपविभागीय पोलीस अधिकारी पुसद, श्री. अमर मोहीते सा, तसेच मा. पोलीस निरीक्षक श्री. सतीश चवरे स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ, यांचे मार्गदर्शनात सपोनि/धिरज बांडे, पोउपनि/अमोल राठोड, सफौ/मुन्ना आडे, सफौ संतोष भोरगे, पोहवा/तेजाब रणखांब, पोहवा/सुभाष जाधव, पोहवा/कुणाल मुंडोकार, पोहवा रमेश राठोड, पोशि/सुनिल पंडागळे चापोउपनि/रविंद्र शिरामे, चापोशि/राजेश जाधव सर्व नेम-स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ यांनी यशस्वीरित्या पार पाडली आहे.












