उमरखेड तालुक्यातील बंदी भागातील विविध प्रलंबित व महत्त्वपूर्ण समस्यांच्या निराकरणासाठी आज जिल्हाधिकारी कार्यालय, यवतमाळ येथे माननीय जिल्हाधिकारी श्री. विकास मीना साहेब यांच्या उपस्थितीत विशेष बैठक संपन्न झाली.या बैठकीमध्ये बंदी भागातील ग्रामस्थांच्या विविध समस्या, मूलभूत सुविधा, विकासकामे तसेच प्रलंबित मागण्यांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. ग्रामस्थांचे म्हणणे जिल्हाधिकाऱ्यांनी गांभीर्यपूर्वक ऐकून घेत संबंधित विभागांच्या अधिकाऱ्यांना तात्काळ आवश्यक कार्यवाही करण्याचे निर्देश दिले.या बैठकीस लोकनेते माजी आमदार श्री. उत्तमराव इंगळे साहेब, पुसद भाजपा जिल्हाध्यक्ष सौ. आरतीताई फुफाटे, माजी आयुक्त श्री. संभाजीराव सरकुंडे, भाजपा शहराध्यक्ष श्री. अतुलभाऊ खंदारे, श्री. बबलूजी जाधव, श्री. उत्तमराव पांडे, श्री. विश्वनाथराव खराटे, के.सी. खंदारे, श्री. पवनभाऊ मेंढे तसेच परिसरातील मान्यवर पदाधिकारी, अधिकारीवर्ग आणि मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.बंदी भागातील जनतेच्या समस्या मार्गी लावण्यासाठी प्रशासनाकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाला असून, लवकरच या भागातील प्रलंबित प्रश्नांचे निराकरण होऊन विकासकामांना गती मिळेल,असा विश्वास आहे.













