विजय कदम लोकहित लाईव्ह न्यूज संपादक
राज्य शासनामार्फत राबविण्यात येत असलेल्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना (PAHSKY) – २०२६ अंतर्गत पात्र शेतकऱ्यांची आधार e-KYC प्रक्रिया आपले सरकार सेवा केंद्रामार्फत करण्यात येत आहे.
मा. सहकार आयुक्त व निबंधक, सहकारी संस्था, महाराष्ट्र राज्य, पुणे यांच्या निर्देशानुसार सदर आधार e-KYC सेवा शेतकऱ्यांसाठी पूर्णपणे विनामूल्य असून, कोणत्याही शेतकऱ्याकडून सेवा शुल्क, सुविधा शुल्क अथवा इतर कोणत्याही प्रकारचे शुल्क आकारण्यात येऊ नये. शासनामार्फत आपले सरकार सेवा केंद्र चालकांना नियमानुसार स्वतंत्रपणे सेवा शुल्क अदा करण्यात येणार आहे.
त्याअनुषंगाने सर्व आपले सरकार सेवा केंद्र चालकांना खालीलप्रमाणे निर्देश देण्यात येत आहेत :
१. PAHSKY – २०२६ अंतर्गत पात्र शेतकऱ्यांना आधार e-KYC सेवा पूर्णपणे विनामूल्य उपलब्ध करून द्यावी.
२. सदर सेवेसाठी कोणत्याही शेतकऱ्याकडून सेवा शुल्क, सुविधा शुल्क अथवा इतर कोणत्याही प्रकारचे शुल्क आकारू नये.
३. सदर सेवा शेतकऱ्यांसाठी विनामूल्य उपलब्ध असल्याची स्पष्ट माहिती प्रत्येक लाभार्थ्यास देण्यात यावी व कोणत्याही प्रकारे शुल्क आकारले जाणार नाही याची दक्षता घ्यावी.
४. कोणत्याही केंद्राकडून शेतकऱ्यांकडून शुल्क आकारण्यात येत असल्याची तक्रार प्राप्त झाल्यास अथवा पडताळणीदरम्यान तसे आढळल्यास, संबंधित प्रकरणाची चौकशी करून दोषी आढळणाऱ्या केंद्राविरुद्ध प्रचलित शासन नियमांनुसार आवश्यक ती कार्यवाही करण्यात येईल.
५. सदर सूचनांची तात्काळ अंमलबजावणी करून शेतकऱ्यांना कोणताही आर्थिक भार पडणार नाही याची दक्षता घ्यावी.
सदर बाब अत्यंत महत्त्वाची असून सर्व संबंधितांनी वरील निर्देशांचे काटेकोरपणे पालन करावे.असे आवाहन यवतमाळ जिल्ह्याचे जिल्हाधिकारी विकास मीना यांनी केले आहे.











