विजय कदम (लोकहित लाईव्ह न्युज संपादक )
मंगळवार दिनांक 8 सप्टेंबर 2026 रोजी श्री.वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय,यवतमाळ
येथे नेत्ररोग विभागाच्या वतीने नेत्रदान पंधरवडा उत्साहपुर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. समाजामध्ये नेत्रदानाबाबत जागरुकता निर्माण करणे,नेत्रदानासंदर्भात गैरसमज दुर करणे आणि अधिकाधिक नागरिकांना नेत्रदानासाठी प्रवृत्त करणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश होता.महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ.प्रशांत अरुण उईके यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजीत या जनजागृती कार्यक्रमास उप-अधिष्ठाता डॉ.रविंद्र राठोड,नेत्ररोग विभागाचे प्राध्यापक व विभाग प्रमुख डॉ.राजेश जोशी सहयोगी प्राध्यापक, डॉ.स्नेहल बोंडे,डॉ.चौरसिया,सहयोगी प्राध्यापक डॉ.अक्षय पडगीलवार व डॉ.सुप्रिया सुटे तसेच जिल्हानेत्र शल्यचिकित्सक डॉ.मनोज तगडपल्लीवार यांची प्रमुख उपस्थिती होती.एकत्रीत प्रयत्नातुन प्रभावी जनजागृतीनेत्रदानाचा संदेश अधिकाअधिका लोकापर्यत पोहोचविण्यासाठी कार्यक्रमाचे नियोजन,आयोजन आणि अंमलबजावणी नेत्र रोग विभागातील संपुर्ण चमु यांच्या समन्वयाने आणि उत्स्फुर्त सहभागातुन केली. विभाग प्रमुख विद्यार्थ्यांना एकत्रीतपणे विविध उपक्रमाची जबाबदारी पार पाडली.डॉ.निखिल चांदोरे,डॉ.नेहल मोहता,डॉ.कस्तुर पुनसे,डॉ.समुध्दी जैन तसेच नेत्ररोगविभागातील सर्व वरीष्ठ निवासी विद्यार्थ्यांनी कार्यक्रमाच्या नियोजनापासुन ते प्रत्यक्ष अंमलबजावनी पर्यत सक्रिय सहभाग घेतला. प्रत्येकाने आपली भुमिका प्रभाविपणे पार पाडत परस्पर समन्वयातुन कार्यक्रमाला यशस्वी स्वरुप दिले.विशेष म्हणजे सन 2023 च्या बॅचच्या एम.बी.बी.एस विद्यार्थ्यांनी या उपक्रमात उत्स्फुर्त सहभाग नोंदवुन रांगोळी पोस्टर स्पर्धा आणि नेत्रदानाच्या जनजागृतीसाठी पथनाटय (स्किट) सादर केले. विद्यार्थ्यांच्या कलात्मक आणि प्रभावी सादरीकरणातुन नेत्रदानाचे महत्व तसेच नेत्रदानासंबंधीत असलेले गैरसमज आणि मृत्युनंतर नेत्रदानामुळे दुसऱ्या व्यक्तीला द्दृष्टी मिळण्याची शक्यता याबाबत जनजागृती करण्यात आली.नेत्रदात्याच्या कुटुंबाचा सन्मान
कार्यक्रमात नेत्रदान करुन अंधत्व निमुलनाच्या कार्यात मोलाचे योगदान देणारे स्व.अग्रवाल यांच्या कुटुंबीयांचा विशेष सत्कार करण्यात आला. त्यांच्या संवेदनशील आणि प्रेरणादायी निर्णयाबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यात आली.”एका व्यक्तीच्या मृत्युनंतरही दुसऱ्याच्या आयुष्यात प्रकाश निर्माण होऊ शकतो” हा संदेश त्यांच्या योगदानातुन अधोरेखीत झाला.
या कार्यक्रमास कॉर्नियल प्रत्यारोपण झालेले रुग्ण देखील उपस्थित होते.नेत्रदानामुळे त्यांना मिळालेल्या द्दृष्टीमुळे त्यांच्या जिवनात झालेला सकारात्मक बदल उपस्थितासमोर मांडझयात आला. त्यामुळे नेत्रदान हा केवळ एक सामाजिक उपक्रम नसुन एखाद्या व्यक्तीच्या आयुष्यात प्रत्यक्ष बदल घडवुन आणणारे महान कार्य आहे. हा संदेश अधिक प्रभाविपणे पोहोचला.
“नेत्रदान करा अंधत्वाविरुध्दच्या लढायात सहभागी व्हा”
यावेळी उपस्थित मान्यवरांनी नागरिकांना मृत्युनंतर नेत्रदान करण्याचा संकल्प करण्याचे आवाहाण केले.समाजातील प्रत्येक घटकाने नेत्रदान चळवळीत सहभागी झाल्यास कॉर्नियल अंधत्वामुळे द्दृष्टी गमावलेल्या अनेक रुग्णांना नवजीवन आणि नवद्दृष्टी मिळु शकते असे प्रतिपादन करण्यात आले.
नेत्ररोग विभागातील डॉक्टर,पदव्युत्तर विद्यार्थी आणि सन 2023 बॅचच्या एम.बी.बी.एस. विद्यार्थ्यानी केलेले हे समन्वयित टिमवर्क,उत्स्फुर्त सहभाग आणि सामाजिक बांधिलकी यामुळे नेत्रदान पंधरवाड्याचा हा उपक्रम प्रभावी जनतागृती मोहीमेत रुपांतरीत झाला. वैद्यकीय सेवा विद्यार्थी सहभाग आणि सामाजिक जनजागृती यांचा सुंदर संगम घडवुन आणणारा हा उपक्रम यवतमाळमध्ये नेत्रदान चळवळीला बळ देणारा ठरला.











