विजय कदम लोकहित लाईव्ह न्युज संपादक
आरक्षण उप वर्गीकरण विरोधी कृती समिती उमरखेड तालुका व शहरच्या वतीने आज दिनांक १५ जुलै रोजी उपविभागीय अधिकारी यांना निवेदन देवुन अनुसूचित जातीतील उपवर्गीकरण लागु करण्याचा असंविधानिक डाव हाणून पाडण्यासाठी दिनांक12 ऑगस्ट 2026 रोजी आंदोलन करीत असल्याबाबत इशारा देण्यात आला आहे .
अनुसूचित जातीमध्ये बेकायदेशीर घटनाबाह्य उप वर्गीकरण लागू करण्याचा हेतू हाणून पाडण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रभर उपवर्गीकरणाच्या विरोधात मोर्चे आंदोलने सुरू आहेत, त्या अनुषंगाने उमरखेड येथील विरोधी कृती समीती ही अनुसूचित जातीतील सर्व जाती त्यामध्ये प्रामुख्याने, बौद्ध, चर्मकार, भंगी मेहतर, वाल्मिकी, होलार, खाटीक, मुरड, 59 जातीपैकी 58 जाती मिळुन दिनांक 12 ऑगस्ट 2026 रोजी उमरखेड शहरात आंदोलन करणार असून मोर्चासह इतर आंदोलन करेल असा इशारा निवेदन सादर करून देण्यात आला आहे . यामध्ये
आंदोलनाचे स्वरूप व मार्ग हे शहरातील डॉ . बाबासाहेब आंबेडकर पुतळा ते उपविभागीय अधिकारी कार्यालय उमरखेड हे राहणार असून दिनांक 12 ऑगस्ट 2026 रोजी दुपारी 12:00 वाजता आंदोलनाला सुरुवात होणार असल्याचे यावेळी निवेदनकर्ते जॉन्टी विणकरे, शाम धुळे, देवानंद पाईकराव, शुद्धोधन दिवेकर, वीरेंद्र खंदारे कैलास कदम, सचिन वाहुळे, गौतम नवसागरे,, सिद्धार्थ दिवेकर, राहुल धुळधुळे, संभाजी हापसे, भीमराव खंदारे, अभिषेक कांबळे, बबनराव वाहूळे, जगजीवन गायकवाड, अमोल सूर्यवंशी, रंगराव सोनटक्के, अरविंद लोमटे, सखाराम धुळे, समाधान पंडित, गोविंद हापसे, सिद्धार्थ मुनेश्वर यांनी प्रशासनाला इशारा दिला आहे .
सोबत फोटो :
उपविभागीय कार्यालयात निवेदन देतांना उपवर्गीकरण विरोधी कृती समितीचे पदाधिकारी












