.
विजय कदम लोकहित लाईव्ह न्युज संपादक
ब्राह्मणगाव चातारी ते कारखेड या रस्त्याचे 20 कोटी रुपयाच्या विकास कामाचे आज चातारी मध्ये भूमिपूजन झाले. आणि त्या ठिकाणी फलक सुद्धा लावण्यात आलेले आहे. परंतु उमरखेड तालुक्यामध्ये सर्वात जास्त असलेला आदिवासी समाज आणि या समाजाचे नेते माजी आमदार उत्तमरावजी इंगळे साहेब यांचे नावच नाही. एवढी एलर्जी का असावी असा प्रश्न आदिवासी समाजामध्ये उपस्थित केला जात आहे.उमरखेड-महागाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार किसनराव वानखेडे यांनी मतदारसंघातील आदिवासी समाजाचे ज्येष्ठ नेते तथा माजी आमदार उत्तमरावजी इंगळे यांच्याकडे दुर्लक्ष केल्याचा किंवा त्यांचा विसर पडल्याचा विषय सध्या राजकीय वर्तुळात आणि स्थानिक पातळीवर चर्चेत आहे. उत्तमरावजी इंगळे हे उमरखेड मतदार संघात दहा वर्ष आमदार राहिलेले आहेत. मतदारसंघाचे माजी आमदार असून आदिवासी समाजात त्यांचा मोठा दबदबा आणि आदराचे स्थान आहे. त्यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीत समाजाच्या विकासासाठी आणि मतदारसंघाच्या प्रश्नांसाठी मोठे योगदान दिले आहे.
स्थानिक राजकारण: अलीकडच्या काळात सार्वजनिक कार्यक्रम, विकासकामांचे भूमीपूजन किंवा राजकीय बैठकांमध्ये ज्येष्ठ नेत्यांना डावलले जात असल्याच्या भावना आदिवासी समाजाकडून व कार्यकर्त्यांकडून व्यक्त होत आहेत. यामुळे आदिवासी समाज आणि जुन्या जाणत्या नेत्यांच्या समर्थकांमध्ये नाराजीचे वातावरण पाहायला मिळते.विद्यमान आमदारांनी पक्षीय राजकारण किंवा इतर कारणांमुळे ज्येष्ठ नेत्यांचा सन्मान राखणे आणि त्यांच्या अनुभवाचा व मार्गदर्शनाचा लाभ घेणे गरजेचे असते, जाणून बुजून माजी आमदार उत्तमराव इंगळे साहेब यांचे राजकारण संपवण्याचा कट रचल्या जात असल्याचा आरोप चातारी येथील व सर्व उमरखेड तालुक्यातील आदिवासी समाजाने केला आहे. त्यामुळे उमरखेड महागाव विधानसभा क्षेत्रामध्ये आदिवासी समाज व भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते यांच्यामध्ये तीव्र नाराजी व्यक्त केल्या जात आहे













