यवतमाळ जिल्हयात कोणत्याही प्रकारचे अवैध धंदे, अवैध शस्त्र (अग्नीशस्त्र) बाळगणा-या तसेच अउघड गुन्हे, आरोपी शोध तसेच गुंगीकारक औषधद्रव्याची तस्करी समुळ उच्चाटन व्हावे याकरीता मा. पोलीस अधीक्षक श्री. कुमार चिंता (भा.पो.से) यांनी पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ यांना आदेशीत केले होते. त्याच अनुषंगाने पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ यांनी त्याचे अधिनस्थ पथकांना गोपनिय माहीती काढून प्रभावी छापा कारवाई करणे बाबत सुचना दिल्या आहेत.
दिनांक 19/09/2026 रोजी स्थानिक गुन्हे शाखा पथक यवतमाळ कॅम्प पुसद हे अउघड गुन्हे आरोपी शोध कामी उमरखेड उपविभाग पोलीस स्टेशन पोफाळी हददीत असतांना नमूद पथकांस गुप्त बातमीदाराव्दारे माहीती मिळाली कि, मौजे तरोडा फाटा पुसद ते उमरखेड रोड हॉटेल जवळ एक इसम ज्याने अंगात काळया रंगाचा टी शर्ट व काळया रंगाची पॅन्ट परिधान केलेले त्याचेकडे एक गावठी बनावटीची देशी पिस्टल असून तो तरोडा फाटा हॉटेल जवळ थांबला आहे. अशी गोपनीय माहिती मिळाल्याने स्थागुशा पथक तात्काळ पंचासह तरोडा फाटा पुसद ते उमरखेड रोड येथे रवाना होवून संशयीत इसम यास ताब्यात घेवून त्यास त्याचे नाव विचारले असता त्याने त्याचे नाव शेख अरबाज शेख रोशन वय 23 वर्ष, रा.वरुड ता.पुसद जि. यवतमाळ असे सांगितल्याने त्याची अंगझडती घेतली असता त्याचे कमरेला गावठी बनावटीचा देशी पिस्टल किंमत अंदाजे 30,000/- रु तसेच एक राऊड (काडस्तुस) किंमत 1000/- रु असा एकूण 31,000/-रु माल मिळून आल्याने तो जप्त करुन ताब्यात घेवून नमूद इसम यांच्या विरुध्द पोलीस स्टेशन पोफाळी येथे भारतीय हत्यार कायदा कलम 3, 25 अन्वये गुन्हा नोंदीसह त्यास पुढील कार्यवाही करीता ताब्यात दिले.
सदरची कारवाई मा. पोलीस अधीक्षक यवतमाळ श्री. कुमार चिंता (भा.पो.से) सा, मा.अपर पोलीस अधीक्षक यवतमाळ श्री. अशोक थोरात (म.पो.से) सा. सहा पोलीस अधीक्षक तथा उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. गौरव कायंदे पाटील (भा.पो.से) सा तसेच मा. पोलीस निरीक्षक श्री. सतीश चवरे स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ, सहा पोलीस निरीक्षक, श्री. निलेश शेंबडे पोलीस स्टेशन पोफाळी यांचे मार्गदर्शनात स.पो.नि.धिरज बांडे, पोउपनि/अमोल राठोड, पोउपनि सुरेश शिंदे, पो स्टे पोफाळी, सफौ मुन्ना आडे, सफौ/संतोष भोरगे, पोहवा/तेजाब रणखांब, पोहवा/सुभाष जाधव, पोहवा/रमेश राठोड, पोशि/सुनिल पंडागळे, चापोउपनि रविंद्र शिरामे, चोपाशि/राजेश जाधव सर्व नेम-स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ तसेच सफौ/प्रल्हाद राठोड, पोहवा/प्रभाकर जाधव पोलीस स्टेशन पोफाळी यांनी यशस्वीरित्या पार पाडली आहे.












