यवतमाळ जिल्हात कोणत्याही प्रकारचे अवैध धंदे, शस्त्र बाळगणा-या तसेच अउघड गुन्हे, आरोपी शोध, अवैध धंदे तसेच गुंगीकारक औषधद्रव्याची तस्करी समुळ उच्चाटन व्हावे याकरीता मा. पोलीस अधीक्षक श्री. कुमार चिंता (भा.पो.से) यांनी पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ यांना आदेशीत केले होते. त्याच अनुषंगाने पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ यांनी त्याचे अधिनस्थ पथकांना गोपनिय माहीती काढून प्रभावी छापा कारवाई करणे बाबत सुचना दिल्या आहेत.
दिनांक 24/09/2026 रोजी स्थानिक गुन्हे शाखा पथक यवतमाळ कॅम्प पुसद यांना गुप्त बातमीदारा मार्फत बातमी मिळाली कि, पोलीस स्टेशन पुसद ग्रामीण हददीतील मौजे जनुना शेतशिवारात शेतात इसम नामे- संतोष किसन लोहटे यांने त्याचे शेतात गांजा अंमली पदार्थ झाडाची लागवड केलेली आहे अशी माहीती मिळाल्याने संदर्भात प्राप्त माहिती वरुन पथकाने तात्काळ वरिष्ठांना याबाबत अवगत करुन मौजे जनुना शेतशिवारात जावून पंचा समक्ष सापळा कारवाई केली असता मौजे जनुना गावच्या हददीत जनुना शेतशिवारात इसम नामे-संतोष किसन लोहटे हा त्याचे ताब्यातील शेतामध्ये गांजा अंमली पदार्थाचे एकूण 22 झाडे लावलेली मिळून आल्याने सदरची गांजा अंमली पदार्थ झाडे एकूण किंमत 24,000/- रु चा मुददेमाल पंचा समक्ष जप्तीसह इसम नामे संतोष किसन लोहटे वय 35 वर्ष, रा. जनुना ता. पुसद जि.यवतमाळ यांच्या विरुध्द पोलीस स्टेशन पुसद ग्रामीण येथे अंमली औषधी व मनप्रभावी पदार्थ अधिनियम 1895 चे कलम 8 (ब), 20 (a), (i) अन्वये गुन्हा नोंदीसह कार्यवाही करण्यात आली आहे.
स्थानिक गुन्हे शाखा, यवतमाळ ही अवैध धंदे, शस्त्र बाळगणा-या, गुन्हे उघड करणे तसेच गुंगीकारक औषधद्रव्याची तस्करी चे उच्चटन करण्यास प्रतिबध्द असुन यापुढे यासंबंधी माहिती असल्यास सदरची माहिती जनतेने पोलीसाची कोणतीही भिती मनात न बाळगता पुरवावी व पोलीसांना सहकार्य करावे ही विनंती.
सदरची कारवाई मा पोलीस अधीक्षक यवतमाळ श्री. कुमार चिंता (भा.पो.से) सा, मा.अपर पोलीस अधीक्षक यवतमाळ श्री. अशोक थोरात (म.पो.से) सा तसेच मा. उपविभागीय पोलीस अधिकारी पुसद श्री. अमर मोहीते सा (म.पो.से) मा.पोलीस निरीक्षक श्री. सतीश चवरे, स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ, यांचे मार्गदर्शनात सपोनि/धिरज बांडे, पोउपनि/अमोल राठोड, सफौ/मुन्ना आडे, सफौ/संतोष भोरगे, पोहवा/तेजाब रणखांब, पोहवा सुभाष जाधव, पोहवा/रमेश राठोड, पोशि/सुनिल पंडागळे, चापोउपनि रविंद्र श्रीरामे, चापोशि/राजेश जाधव सर्व नेम-स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ यांनी यशस्वीरित्या पार पाडली आहे.











