तक्रारदार राधेश्याम नरसिंगदास भट्टड रा.ता.उमरखेड जि. यवतमाळ यांची पत्नी दिनांक २६/०९/२०२६ रोजी दुपारी ०२.०० वा. ते ०३.०० वा.चे दरम्यान त्यांचेकडील दागिने सराफा दुकानात घेवून जात असताना एकूण ०७ तोळे वजनाचे सोन्याचे वेगवेगळे दागिने आसलेले पाउच रस्त्यात कुठेतरी पडल्याने त्यांनी त्याबाबत पोलीस स्टेशनला सोन्याचे दागिने गहाळ झाले बाबत दिनांक ३०/०९/२०२६ रोजी अर्ज सादर केला होता.
सदर घटनेचे गांभीर्य पाहता प्रभारी ठाणेदार स.पो.नि.अमोल गुंडे यांनी त्याबाबत गौरव कायंदेपाटील साहेब सहाय्यक पोलीस अधीक्षक तथा उपविभागीय पोलीस अधिकारी उमरखेड उपविभाग यांनी माहीती देवून त्यांनी सदर दागिने शोधण्या बाबत सुचना दिल्या होत्या त्याप्रमाणे प्रभारी ठाणेदार स.पो.नि. अमोल गुंडे यांनी डी. बी. पथक प्रमुख पोलीस उपनिरीक्षक शरद लोहकरे व त्यांचे डि.बी.टीम ला सदर गहाळ झालेले एकूण ०७तोळे वजनाचे दागिणे शोधणे बाबत आदेशित केले होते. त्याप्रमाणे सदर पथकाने गोपनीय माहीती, सी.सी.टी. व्ही. फुटेज व तांत्रिक विश्लेषण यांचे सहाय्याने सदरचे दागिने ढाणकी पोलीस स्टेशन हद्दीतील बिटरगाव येथील एका महीलेला सापडल्याचे निष्पन्न करून सदर महीलेकडे त्या दागिने बाबत विचारपुस करता त्यांनी देखील सदरचे दागिने अगदी मनमोकळेपणे काढून देवून सदरचे दागिने कोणाचे आहेत किंवा कुणाकडे दयायचे हे न समजल्याने त्यांनी त्यांचे जवळ ठेवल्याचे सागितले, सदरचे सर्वच्या सर्व १०० टक्के दागिने एकूण ०७ तोळे वजनाचे कि.रू. १०,०००,००/- चे ताब्यात घेवून आज रोजी मा. गौरव कायंदेपाटील साहेब सहाय्यक पोलीस अधीक्षक तथा उपविभागीय पोलीस अधिकारी उमरखेड उपविभाग यांचे हस्ते मुळ मालक व अर्जदार श्री. राधेश्याम नरसिंगदास भट्टड रा.उमरखेड ता. उमरखेड जि. यवतमाळ यांना आहे त्या सुस्थित परत करण्यात आले आहेत.
सदरची कारवाई मा. कुमार चिंता पोलीस अधीक्षक यवतमाळ, मा. अशोक थोरात अपर पोलीस अधीक्षक यवतमाळ, मा.गौरव कायंदेपाटील सहाय्यक पोलीस अधीक्षक तथा उपविभागीय पोलीस अधिकारी उमरखेड उपविभाग, प्रभारी ठाणेदार स.पो.नि.अमोल गुंडे, स.पो.नि. व्यंकट गंगलवाड, स.पो.नि. विनायक रामोड यांचे मार्गदर्शनाखाली डी. बी. प्रमुख पोलीस उपनिरीक्षक शरद लोहकरे, सहा. फौजदार विजय पतंगे, पो.हवा. चंदन जाधव, पो.कॉ. संघशिल टेंभरे, पो.कॉ. विष्णू राठोड, पो.कॉ. दिगांबर गिते, पो.कॉ. निवृत्ती महाळनवर, पो.कॉ. अंबादास गवारे उमरखेड पोलीस स्टेशन यांनी यशस्वीरित्या पार पाडली आहे.












