महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष मा. श्री. हर्षवर्धनजी सपकाळ साहेब हे अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघाच्या विधान परिषद निवडणुकीतील काँग्रेसच्या अधिकृत उमेदवार श्रीमती आदितीताई पोहरे यांच्या प्रचारार्थ यवतमाळ येथे उपस्थित राहून सर्व मतदार व काँग्रेस कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहेत.
कार्यक्रमाचा तपशील
- दिनांक : गुरुवार, १५ ऑक्टोबर २०२६
- वेळ : दुपारी ठीक ४:०० वाजता
- स्थळ : उत्सव मंगल कार्यालय, यवतमाळ.
या अनुषंगाने महागाव तालुक्यातील सर्व शैक्षणिक संस्थांचे संस्थाचालक, विधान परिषद शिक्षक मतदारसंघातील मतदार शिक्षक, तसेच काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ पदाधिकारी, नेते व कार्यकर्ते यांनी उद्या दुपारी ठीक ४:०० वाजता उत्सव मंगल कार्यालय, यवतमाळ येथे मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, ही नम्र विनंती.
आपली उपस्थिती प्रार्थनीय आहे!
आपला विनीत,
सुनील भाऊ राठोड
अध्यक्ष, महागाव तालुका काँग्रेस कमिटी
महागाव, जि. यवतमाळ.











